राष्ट्रवादीच्या `परिवार संवाद` यात्रेत `विसंवाद`, जिल्हा कार्याध्यक्षाचा राजीनामा..

(Ncp State President Jayant Patil)जिल्हा कार्याध्यक्षपदाचा राजीनामा दिला (District Working President Resign) असली तरी सदस्य म्हणून पुढेही काम करत राहणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
Jaynat Patil-Abhya Chikatgaonkar
Jaynat Patil-Abhya ChikatgaonkarSarkarnama
Published on
Updated on

औरंगाबाद ः राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष, राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मराठवाड्यात परिवार संवाद यात्रेचा दुसरा टप्पा सुरू केला आहे. परभणी, जिंतूर, जालना जिल्ह्यातून औरंगाबादेत दाखल झालेल्या या परिवार संवाद यात्रेचा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काॅंग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष अभय पाटील चिकटगांवकर यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे.

जयंत पाटील यांच्याकडेच हा राजीनामा देण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीच्या दृष्टीने हा दौरा अत्यंत महत्वाचा मानला जातो. मराठवाड्याच्या राजधानीत राष्ट्रवादी आपले पाय रोवू पाहत आहे. येणाऱ्या महापालिका, जिल्हा परिषद व इतर निवडणुकीत राष्ट्रवादी जोर लावण्याच्या तयारीत असतांनाच पक्षांतर्गत कुरबुरीने तोंड वर काढल्याचे या राजीनाम्यावरून स्पष्ट होते.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत अभय पाटील चिकटगांवकर यांना तरुण नेतृत्वाला संधी म्हणून उमेदवारी दिली होती. तत्कालीन विद्यमान आमदार व अभय पाटील यांचे काका भाऊसाहेब पाटील चिकटगांवकर यांना डावलून ही उमेदवारी देण्यात आली होती. भाऊसाहेब पाटील यांनी देखील उमेदवारीवरून कुटुंबात कलह नको, अशी सांमजस्याची भूमिका घेत माघार घेतली होती.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी वैजापूरात सभा देखील घेतली होती. परंतु राष्ट्रवादीला ही जागा राखता आली नाही. शिवसेनेने ही जागा पुन्हा जिंकली. परंतु त्यानंतर कार्याध्यक्ष असलेल्या अभय पाटील चिकटगांवकर यांचे अस्तित्व वैजापूर वगळता जिल्ह्यात फारसे जाणवले नव्हते. राजीनाम्याचे कारण त्यांनी पत्रात नमूद केले नसले तरी पक्षांतर्गत गटबाजीमुळेच त्यांनी पद सोडल्याची चर्चा आहे.

आता प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील त्यांचा राजीनामा स्वीकारतात, की मग त्यांची समजूत काढून त्यांना पुन्हा कामाला लावतात हे पहावे लागेल. अभय पाटील चिकटगावकर हे राष्ट्रवादीचे माजी आमदार भाऊसाहेब चिकटगावकर यांचे पुतणे व दिवंगत नेते कैलास चिकटगावकर यांचे पुत्र आहेत.

Jaynat Patil-Abhya Chikatgaonkar
एखाद्याचे राजकीय आयुष्य उद्धवस्त करण्याचा विडाच विरोधी पक्षाने उचललायं..

अभय पाटील यांनी राजीनामा देताना आपण वैयक्तिक कारणामुळे राजीनामा देत असल्याचा उल्लेख केला आहे. जिल्हा कार्याध्यक्षपदाचा राजीनामा दिला असली तरी पक्षात सदस्य म्हणून पुढेही काम करत राहणार असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com