युपीएससीत मराठवाड्याचा झेंडा, लातूरच्या नितीशा जगतापसह तीघे उतीर्ण..

(Upsc Exam) लातूरच्या नितिशा संजय जगताप या विद्यार्थिनीने (Latur) पहिल्याच प्रयत्नात देशात १९९ वा क्रमांक पटकावला आहे
Nitisha Jagatp Upsc Exam
Nitisha Jagatp Upsc ExamSarkarnama

औरंगाबाद ः यूपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून शुभम कुमार हा देशात अव्वल आला आहे. या शिवाय जागृती अवस्थी, अंकिता जैन यांनी अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक मिळवत घवघवीत यश मिळवले आहे. युपीएससीच्या 2020 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत एकूण ७६१ उमेदवार उतीर्ण झाले आहेत. यात ५४५ पुरुष आणि २१६ महिलांचा समावेश आहे.

आयएएस अधिकारी असलेल्या टीना डाबी यांची बहीण रिया यांनीही यूपीएससी परीक्षा उतीर्ण केली असून त्यांनी १५ वी रँक मिळवली आहे. युपीएससी परीक्षेत महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थ्यांनी यश मिळवले असून पुण्यातील अंध विद्यार्थिनी पूजा कदम ५७७ व्या रॅंकसह उतीर्ण झाली आहे. तिने यात 577 वी रँक मिळवली आहे.

तर मराठवाड्यातील लातूरची २१ वर्षीय नितिशा जगताप हिने पहिल्याच प्रयत्नात युपीएससी परीक्षेत यश मिळवत 199 वी रॅंक मिळवली. नितिशाने पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात शिक्षण घेतले आहे. तर लातूरच्याच निलेश गायकवाड याने देखील यूपीएससीमध्ये देशात ६२९ वी रॅंक मिळवत यशाल गवसणी घातली.

या शिवाय लातूरच्याच कमलकिशोर कांदरकर याने देखील १३७ वी रॅंक मिळवत युपीएससी परीक्षेत यश मिळवले. मराठवाड्यातीलच जालना येथील अभिजीत वेकोस याने ५०१ वी रॅंक मिळवत परीक्षेत यश मिळवले आहे.

युपीएससीत मराठवाड्यातील तीन विद्यार्थ्यांनी यश मिळवत आपला झेंडा फडकवला आहे. तर सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील शिंदेवाडी येथील शुभम पांडुरंग जाधव याने ४४५ वी रॅंक मिळवून महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

Nitisha Jagatp Upsc Exam
महिलांसाठी खूषखबर; UPSC नं इतिहासात पहिल्यांदाच उचललं मोठं पाऊल

अमित देशमुखांनी केले अभिनंदन..

युपीएससी परीक्षेत लातूरच्या नितिशा संजय जगताप या विद्यार्थिनीने पहिल्याच प्रयत्नात देशात १९९ वा क्रमांक पटकावला आहे, हे वृत्त मनस्वी आनंद देणारे आहे. शैक्षणिक क्षेत्रात आघाडीवर असलेल्या लातूरसाठी तिचे हे उज्वल यश भूषणावह आहे. नितिशा आणि तिच्या पालकांचे मनःपूर्वक अभिनंदन असे म्हणत राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी ट्विटद्वारे नितीशा व तिच्या कुटुंबियांचे अभिनंदन केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com