मेघना बोर्डीकर यांनी विजयाचे श्रेय दिले वडिलांना आणि भाजप नेत्यांना 

शेतीपुरक व्यवसायला प्राधान्यआगामी पाच वर्षात जिंतूर मतदार संघातील रस्ते, विज, पाणी या बरोबरच दर्जेदार शिक्षणासाठी आपण पुढाकार घेणार आहोत. या मतदार संघात शेतीपुरक व्यवसाय वाढीला लागले पाहिजेत असे आपलेउद्दिष्ट आहे.-आमदार मेघना साकोरे
Meghna_Bordikar
Meghna_Bordikar
Published on
Updated on

परभणी :  जिंतूर मतदार संघात मिळालेला विजय हा माझा एकट्याचा नाही तर माझे वडील रामप्रसाद बोर्डीकर यांच्यावर प्रेम करणारे सर्व सहकारी व भाजप नेत्यांचा आहे असे म्हणत जिंतूरच्या नवनिर्वाचित आमदार मेघना साकोरे यांनी आपल्या विजयाचे श्रेय संपूर्ण सहकारी व भाजप नेत्यांना दिला आहे.

जिंतूर - सेलू विधानसभा मतदार संघावर भाजप - शिवसेना महायुतीच्या उमेदवार मेघना साकोरे - बोर्डीकर यांनी  विजय मिळविला आहे. जिंतूर मतदार संघाचे राष्ट्रवादीचे विजय भांबळे यांचा साडेतीन हजार मतांनी पराभव करून मेघना यांनी विजयाची पताका फडकावली आहे.

त्यांनी राष्ट्रवादी कॉग्रेसचे विजय भांबळे यांना टक्कर देत मतदार संघातील बोर्डीकरांचे अस्तित्व  दाखवून दिले. मेघना लोकसभा निवडणुकीपासून सक्रीय झाल्या होत्या. त्या आगोदर त्यांनी दीपस्तंभ प्रतिष्ठानच्या माध्यमातून गावा - गावात विकास कामांना सुरुवात केली होती. 

सामाजिक दायित्व ओळखून ग्रामीण भागातील पाणी, विज, रस्ते यावर सातत्याने अधिकाऱ्यांच्या भेटी घेवून कामाची सोडवणुक करण्याचे काम त्यांनी त्या काळात केले. त्यांच्या कामाचा व जनसंपर्काचा धडाका पाहून भाजपलाही त्यांच्या कामाची दखल घ्यावीच लागली.

लोकसभा निवडणुकीत केवळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एका शब्दावर मेघना बोर्डीकर यांनी  लोकसभा निवडणुकीत माघार घेतली होती.तेव्हाच मुख्यमंत्र्यांनी त्यांना विधानसभेचा शब्द दिला होता.

त्यामुळे मेघना व त्यांचे वडील रामप्रसाद बोर्डीकर यांनी लोकसभेला युतीचे उमेदवार खासदार संजय जाधव यांचे जोरदार काम करून त्यांना जिंतूर मतदार संघातून मताधिक्य मिळवून दिले होते. खासदार संजय जाधव यांना मिळालेले मताधिक्य पाहूनच त्यांच्या  विजयाचे अंदाज बांधले जात होते. विधानसभेच्या विजयानंतर मेघना बोर्डीकर यांनी या विजयाचे श्रेय त्यांनी त्यांचे सर्व सहकारी व भाजपचे सर्व नेत्यांना दिले आहे. 

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com