औरंगाबाद : अद्यापही एमआयएमसोबतची युती तुटली नसल्याचे वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांकडून सांगण्यात येत असलं तरी 'एमआयएम'चे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी ही गोष्ट फेटाळून लावली आहे. वंचितसोबतची युती तोडण्याचा इतका मोठा निर्णय मी 'एमआयएम'चे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्या परवानगीने शिवाय घेऊ शकत नाही. आणि हा निर्णय पक्षाचे अध्यक्ष अससोद्दीन ओवेसी यांनीच घेतला असल्याचं जलील यांनी औरंगाबादमध्ये सांगितले.
शुक्रवारी रात्री उशीरा एका बैठकीत त्यांनी कार्यकर्त्यांना ही माहिती दिली. वंचितच्या निर्णयाची किती दिवस वाट पहायची आणि आठ जागा जर देत असतील का शांत बसायचे म्हणून आम्ही निर्णय घेतला असल्याचे जलील यांनी या बैठकीत सांगितले. शिवाय आता तुम्ही तुमची ताकद दाखवा आणि आम्ही आमची ताकद दाखवतो, असं आव्हानही त्यांनी वंचित बहुजन आघाडीला दिले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.