...म्हणून औरंगाबादच्या SP मोक्षदा पाटील यांनी दिला इशारा!

औरंगाबादजिल्ह्यात कोरोनाचा आलेख सारखा वाढतच असून या महामारीने आता आपली पकड अधिक मजुबत केल्याचे वाढत्या रुग्णसंख्येवरून स्पष्ट होत आहे. आज शहरात कोरोनाने चौदावा बळी घेतला, तर सकळीच कालच्या रुग्णसंख्येत ४४ ने वाढ झाल्याने एकूण बाधितांचा आकडा ६०२ वर पोहचला आहे.
mokshada patil
mokshada patil

औरंगाबाद :  औरंगाबाद ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील  यांचा 13 एप्रिल 2020 रोजी जनहितार्थ संदेश देणारा  एक व्हिडिओ प्रसारीत करण्यात आला होता. 30 एप्रिल पर्यंतच्या लाॅकडाऊन बाबतची त्यात माहिती होती.

दरम्यान, सोमवारी (ता.११)  सदर व्हिडिओ हा सोशल मीडियावर पाठविला जात असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे जनतेची दिशाभूल होत असल्याने हा व्हिडिओ व्हायरल करणाऱ्याचा शोध घेतला जाईल, असा इशारा श्रीमती पाटील यांनी दिला आहे.

 त्या व्हिडिओ मध्ये 30 मे बाबत लाॅडाऊन वाढवला असा त्याचा काही जण अर्थ करून घेत आहेत. परंतु पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून सदर विषयाचा खुलासा करण्यात येतो की सदर क्लिप ही मागील महिन्यातील होती व मागील महिन्याच्या 30 एप्रिल बाबत त्यात उल्लेख केला गेलेला आहे. कृपया सदर क्लिप मधील तारखेबाबत कोणीही संभ्रम निर्माण करू नये व सदर क्लिप या महिन्याची आहे असे मानून कोणालाही फॉरवर्ड करू नये.

याबाबत कोणालाही शंका असल्यास  जनसंपर्क अधिकारी पोलीस अधीक्षक कार्यालय श्री दिनेश जाधव 8805000577, 9923787887 यांना अथवा पोलीस अधीक्षक कार्यालय येथे फोन द्वारे विचारणा करू शकतात असे आवाहन पोलीस अधीक्षक कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.

कोरोनाचा आलेख वाढताच..

औरंगाबादः जिल्ह्यात कोरोनाचा आलेख सारखा वाढतच असून या महामारीने आता आपली पकड अधिक मजुबत केल्याचे वाढत्या रुग्णसंख्येवरून स्पष्ट होत आहे. आज शहरात कोरोनाने चौदावा बळी घेतला, तर सकळीच कालच्या रुग्णसंख्येत ४४ ने वाढ झाल्याने एकूण बाधितांचा आकडा ६०२ वर पोहचला आहे.

दोन दिवसांत शहरातील कोरोना रुग्णांच्या संख्येत तब्बल ९४ जणांची भर पडली असून रोज हा आकडा वाढत असल्याने प्रशासन, आरोग्य यंत्रणा हादरून गेली आहे, नागरिकांमध्ये देखील दहशतीचे वातावरण असून बऱ्या होणाऱ्या रुग्णांपेक्षा नव्याने बाधित होणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने सगळेच चिंतेत पडले आहेत.

आज सकाळीच  ४४ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने बाधितांचा आकडा सहाशेच्या पार झाला. गेल्या पंधरा दिवसांतच जिल्ह्यात ५४९ नवे रुग्ण आढळे आहेत. तर त्याआधीच्या ४२ दिवसांत शहरात कोरोनाचे फक्त ५३ रुग्ण होते. कोरोनाच्या आजारातून बरे होऊन जाणाऱ्यांची संखा ७४ असली तरी नव्या वाढत्या रुग्णांच्या तुलनेत हे प्रमाण कमी आहे.

शहरातील नूर कॉलनीतील दोन मुले, दोन महिला, एक पुरूष, चिकलठाणा एमआयडीसी, भीम नगर आणि संजय नगरातील प्रत्येकी एक पुरूष असे एकूण आठ कोविडबाधितांची कोविड चाचणी निगेटीव्ह आली आहे. त्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयातून (मिनी घाटी) त्यांना आज सुटी देण्यात आली. कोविडमुक्त झालेल्या या आठ जणांमुळे आतापर्यंत 73 जण कोविडमुक्त झाल्याचे मिनी घाटी प्रशासनाने सांगितले. महापालिकेच्या कोविड केअर केंद्रांवरून १३ जण कोरोनामुक्त झाल्यामुळे त्यांनाही काल सुटी देण्यात आली.

दरम्यान, आज शहरात कोरोनाचा चौदावा बळी गेला. रोशन गेट जवळील बायजीपुरा गल्ली क्रमांक तीन येथील ५० वर्षीय कोविड पॉझिटिव्ह रुग्णाचा रविवारी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. त्यांना मधुमेह, किडनीचाही आजार होता. तर कोरोनामुळे औरंगाबादच्या रामनगर, मुकुंदवाडी येथील ८० वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाचा रविवारी मध्यरात्रीनंतर मृत्यू झाला. हा कोरोनाचा शहरातील चौदावा बळी ठरला आहे. चोवीस तासात कोरोनामुळे दोन बळी गले आहेत. सध्या घाटी आणि मिनी घाटीत एकूण ५१५ कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com