भाजपची नामांतराबाबत आघाडी : औरंगाबादच्या विमानतळाला संभाजीराजेंचे नाव लवकरच

देशातील तेरा विमानतळांचीनावे बदलणार..
bhagwat karad
bhagwat karad

औरंगाबाद : महापालिका निवडणूक जवळ आल्याने नेहमीप्रमाणे औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्यावरून राजकीय दळण दळले जात आहे. औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर करण्यासाठी शिवसेनेने पुन्हा चर्चा सुरू केली आहे. यात भाजपने आता पुढाकार घेत औरंगाबाद  येथील आंतरराष्ट्रीय  विमानतळाचे छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नामकरण केंद्र सरकार लवकरच करणार असल्याची माहिती खासदार भागवत कराड यांनी दिली. 

कराड यांनी केंद्रीय विमान नागरी उड्डयन मंत्री हरदीपसिंग पुरी यांची भेट घेऊन ही आग्रही मागणी केली होती. नागरी उड्डयन खात्याने नामांतराचा प्रस्ताव पंतप्रधान कार्यालाकडे पाठविण्यात आला असून, पीएमओने  देशातील  आणखी  तेरा विमानताळाचे नामांतराचे प्रस्ताव मागितले आहेत.

यात महाराष्ट्रातील शिर्डी ,कोल्हापूर आणि औरगाबाद विंमानतळाचा समावेश आहे. शिर्डीचे श्री साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळ तर कोल्हापूर येथील छत्रपती राजाराम महाराज आंतराष्ट्रीय विमानतळ आणि औरंगाबादचे छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नामंतर करण्यात येणार आहे.

याचबरोबर आंध्र प्रदेश ,मध्यप्रदेश ,मणिपूर, उत्तरप्रदेश, पंजाब राज्यातील देखील विमानतळचा नामांतराचा देखील प्रस्ताव आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून लवकरच विमानतळ नामांतराबाबत अधिसूचना काढण्यात येणार असल्याचे  कराड यांनी सांगितले आहे कराड यांनी याबाबत नागरी उड्डयन खात्याचे सचिव  प्रदीप सिंग खरोला आणि प्रधानमंत्री कार्यालयातील संयुक्त सचिव रोहित यादव यांची भेट घेतली आणि विमानतळाच्या नामांतराबाबत चर्चा केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com