`अहमदपूर भाजपचा अधिकृत तालुकाध्यक्ष मीच' 

भाजपच्या तालुकाध्यक्षपदी राम बेल्लाळे, हणमंत देवकते या दोघांची निवड करण्यात आल्यामुळे तालुक्यातील गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे.
भाजपच्या तालुकाध्यक्षपदी राम बेल्लाळे, हणमंत देवकते या दोघांची निवड करण्यात आल्यामुळे तालुक्यातील गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे.
भाजपच्या तालुकाध्यक्षपदी राम बेल्लाळे, हणमंत देवकते या दोघांची निवड करण्यात आल्यामुळे तालुक्यातील गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे.

अहमदपूर : भाजपच्या तालुकाध्यक्षपदी दोघांची निवड करण्यात आल्यामुळे तालुक्यातील गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. अहमदपूर व चाकूर तालुका भाजप कार्यकर्त्यांची बैठक माजी राज्यमंत्री विनायकराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झाल्यानंतर तालुकाध्यक्षपदी राम बेल्लाळे यांची निवड जाहीर करण्यात आली होती. दुसरीकडे आठवडाभरातच भाजपचे प्रदेश प्रवक्ते गणेश हाके यांच्या उपस्थितीत गुरूवारी हणमंत देवकत्ते यांची तालुकाध्यक्ष म्हणून घोषणा करण्यात आली.

तालुक्यात भाजपची ताकद असतानाही नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाचे अधिकृत उमेदवार विनायकराव पाटील यांना पराभव स्वीकारावा लागला होता.

यातून स्थानिक पदाधिकारी काही बोध घेतील असे वाटले होते. परंतु दोन तालुकाध्यक्षांची निवड झाल्यामुळे पक्षात अजूनही अंतर्गत गटबाजी आणि धुसफूस असल्याचे स्पष्ट झाले आहे. राम बेल्लाळे हे माजी राज्यमंत्री विनायकराव पाटील यांच्या गटाचे तर हणमंत देवकत्ते हे भाजपचे प्रदेश प्रवक्ते गणेश हाके यांचे समर्थक म्हणून ओळखले जातात.

अधिकृत तालुका अध्यक्ष मीच
भाजपचे जिल्हाध्यक्ष रमेश कराड यांच्या स्वाक्षरीने १२ मार्च रोजी लातूर येथे माझ्या तालुकाध्यक्ष पदाच्या निवडीचे पत्र भाजपचे प्रदेश प्रवक्ते गणेश हाके, जिल्हा परिषदेचे आरोग्य व बांधकाम सभापती प्रकाश देशमुख, त्रिंबक गुट्टे यांच्या उपस्थितीत देण्यात आले आहे. त्यामुळे मीच भारतीय जनता पक्षाचा अधिकृत तालुकाध्यक्ष असल्याचा दावा हणमंत देवकते यांनी केला आहे. 

भाजपचे लोकप्रतिनिधी, बुथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख, कार्यकर्ते तसेच सक्रीय सभासद अश्या जवळपास ८०० जणांच्या उपस्थितीत माझी भाजपच्या तालुकाध्यक्षपदी फेरनिवड झाली आहे. त्यामुळे मीच भारतीय जनता पक्षाचा अधिकृत तालुकाध्यक्ष असल्याचे राम बल्लाळे यांनी म्हटले आहे.

दोन तालुकाध्यक्षांच्या निवडीवरून वाद निर्माण झालेला असतांना भाजपच्या पदाधिकारी व जेष्ठ कार्यकर्ते यांच्याशी चर्चा करूनच आपण अधिकृतरित्या हणमंत देवकते यांना तालुकाध्यक्ष निवडीचे पत्र दिले आहे. त्यामुळे आज नव्याने निवड करण्यात आलेल्या तालुकाध्यक्षांची मला कुठल्याच प्रकारची माहिती नसल्याचे सांगत जिल्हाध्यक्ष रमेश कराड यांनी देवकाते यांचीच निवड अधिकृत असल्याचे सांगितले आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com