राजीनामाअस्त्र उपसलेल्या अब्दुल सत्तारांच्या मनधरणीसाठी शिवसेनेकडून 'अर्जुनअस्त्र'

जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये शुक्रवारी विद्यमान जिल्हा परिषद अध्यक्ष देवयानी डोणगावकर यांनी बंडखोरी करीत अपक्ष अर्ज दाखल केला. त्यांना भाजपच्या सर्व सदस्यांचे पाठबळ मिळाले. सोबतच काँग्रेसमधून फुटलेले अब्दुल सत्तार समर्थकांनीही देवयानी डोणगावकर यांच्या बाजूने मतदान केले.
Arjun Khotkar Trying to Convience Abdul Sattar
Arjun Khotkar Trying to Convience Abdul Sattar
Published on
Updated on

औरंगाबाद : मी राज्यमंत्री आहे, त्यामुळे किमान माझ्या मतदारसंघातील निर्णय मला घेऊ द्या; जिल्हा परिषदेच्या सदस्यांची भूमिका काय आहे, हे मला समजून घेऊ द्या. प्रत्येक वेळी आम्ही शिवसेनेचे जुने नेते आहोत म्हणून स्वतः निर्णय घेत असेल, तर मी कशाला पक्षात राहू, असं म्हणत अब्दुल सत्तार यांनी राज्यमंत्री पदाच्या राजीनाम्याचे शस्त्र बाहेर काढल्यावर शिवसेनेमध्ये खळबळ उडाली आहे. 

जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये शुक्रवारी विद्यमान जिल्हा परिषद अध्यक्ष देवयानी डोणगावकर यांनी बंडखोरी करीत अपक्ष अर्ज दाखल केला. त्यांना भाजपच्या सर्व सदस्यांचे पाठबळ मिळाले. सोबतच काँग्रेसमधून फुटलेले अब्दुल सत्तार समर्थकांनीही देवयानी डोणगावकर यांच्या बाजूने मतदान केले. त्यावेळी अब्दुल सत्तार यांनी महाविकास आघाडीचा आणि काँग्रेसचा अध्यक्ष होऊ नये म्हणून खबरदारी घेतली होती, अशी चर्चा सुरू झाली. त्यानंतर रात्री उशिरा अब्दुल सत्तार यांची माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी भेट घेतल्यानंतर अब्दुल सत्तार यांची नाराजी समोर आली आहे. 

अब्दुल सत्तार यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे राज्यमंत्री पदाचा राजीनामा दिला असल्याचे सध्या सांगण्यात येत आहे. मात्र, याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. अब्दुल सत्तार यांची नाराजी दूर करण्यासाठी आणि त्यांना समजावून सांगण्यासाठी काल संध्याकाळी माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांना औरंगाबादमध्ये पाठवण्यात आले. रात्री दीड वाजेपर्यंत अर्जुन खोतकर यांनी औरंगाबाद शहरातल्या जालना रोडवर असलेल्या एका हॉटेलमध्ये त्यांची समजूत काढली. 

अब्दुल सत्तार यांनी राजीनामा देऊ नये सोबतच जिल्हा परिषदेमध्ये शिवसेनेसोबतच असावेत अशी विनवणी अर्जुन खोतकर यांनी केली. ही भेट खुद्द शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीच घ्यायला लावली होती. सोबतच शिवसेनेतील काही वरिष्ठ नेते फोनवरून ही अब्दुल सत्तार त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला अशी माहिती मिळाली आहे.

अब्दुल सत्तार हे राज्यमंत्री झाल्यावर नाराज होते. किमान कॅबिनेट मंत्री पदाची सत्तारांना अपेक्षा होती. त्यापाठोपाठ जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये हे त्यांच्या मर्जीचा अध्यक्षपद बसवावा अशी त्यांची इच्छा होती. मात्र त्यांना शिवसेना नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि आमदार अंबादास दानवे यांनी काही जुमानले नाही. 

त्यामुळे आपले उपद्रव मूल्य दाखवण्यासाठी अब्दुल सत्तार यांनी नवी खेळी करून दाखवली असल्याची चर्चा सुरू आहे. यात शिवसेनेतून बंडखोरी केलेल्या आणि विद्यमान अध्यक्ष देवयानी डोणगावकर या पुन्हा अध्यक्ष होतील अशी स्थिती काल निर्माण झाली होती.

या प्रक्रियेला पूर्णता अब्दुल सत्तार समर्थक सदस्य जबाबदार असल्याचे शिवसेनेकडून सांगितले जात आहे. जिल्हा परिषदेत गेल्या अडीच वर्षांपासून काँग्रेस आणि शिवसेनेची एकत्रित सत्ता असल्यामुळे राज्यात नव्याने होऊ घातलेल्या समीकरणामुळे सहजरित्या महाविकास आघाडीचा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष होईल असे बोलले जात होते. मात्र, भाजपच्या प्रयत्नाला शिवसेनेकडून साथ मिळाल्यामुळे संपूर्ण गणितच बिघडून गेले. आता आज औरंगाबाद जिल्हा परिषदेवर कोण यशस्वी होतो हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com