शिवसेनेने मैदानावर पळवले क्रीडा अधिकारी

मैदानावरील माती उडत असल्याने तोंडावर रुमाल बांधून खेळाडू पळत असल्याचे कळल्यावर शिवसेना कार्यकर्त्यांनी विभागीय क्रीडा संकुलात पुन्हा धडक दिली. 'मातीच्या मैदानावर पळून दाखवा', असे सांगत सेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी क्रीडा अधिकाऱ्यांना ट्रॅकवर धावायला लावले.
शिवसेनेने मैदानावर पळवले क्रीडा अधिकारी
Published on
Updated on

औरंगाबाद : मैदानावरील माती उडत असल्याने तोंडावर रुमाल बांधून खेळाडू पळत असल्याचे कळल्यावर शिवसेना कार्यकर्त्यांनी विभागीय क्रीडा संकुलात पुन्हा धडक दिली. 'मातीच्या मैदानावर पळून दाखवा', असे सांगत सेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी क्रीडा अधिकाऱ्यांना ट्रॅकवर धावायला लावले.

विभागीय क्रीडा संकुलातील अॅथलेटिक्स ट्रॅकवर मातीचे साम्राज्य आहे. या ट्रॅकवर धावणाऱ्या खेळाडूंना नाकावर रुमाल बांधून पाळावे लागते आहे. हे कळाल्यावर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी (ता. 30) संकुलात धाव घेतली. सलग तिसऱ्यांदा गेल्यावरही उपसंचालक राजकुमार महादवाड भेटले नाहीत त्यामुळे त्यांच्या कार्यालयाला शिवसैनिकांनी कुलूप ठोकले आणि नंतर उघडलेही. कँटीनमध्ये जात शिवसैनिकांनी 'डायट चार्ट' नुसार अन्न नसल्याचे आढळल्यावर कँटीन चालकाची कान उघडणी जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी केली. त्यानंतर मैदानावर पाणीच मारले नसल्याने येथील ट्रॅक उखडला असून भुसभुशीत झालेल्या मैदानावर अर्धपोटी खेळाडूंनी कसे पळावे हे दाखवा, असे सांगत शिवसेनेने क्रीडा अधिकारी चंद्रशेखर घुगे आणि वॉर्डन सुनील वानखेडे यांना मैदानावर पाळायला लावले. 

यावेळी शहरप्रमुख विजय वाघचौरे, राजेंद्र दानवे, नरेश भालेराव, राजू वाकुडे, शिल्परणी वाडकर, नंदू लबडे आदींची उपस्थिती होती. क्रीडा उपसंचालक राजकुमार महादावाड हे बुधवारी अनुपस्थित होते. आजारी असल्याने ते कार्यालयात आले नसल्याचा निरोप क्रीडा अधिकाऱ्यांनी दिला. त्यानंतर येथील अडचणींचा पाढा अंबादास दानवे यांनी विभागीय संकुल समिती अध्यक्ष डॉ. पुरुषोत्तम भापकर, क्रीडा आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी कानावर घातला.

पोरं उपाशी ठेवता, देऊ का काना मागे?
औरंगाबादच्या विभागीय क्रीडा संकुलाच्या कँटीनमध्ये असलेल्या डायट चार्ट नुसार जेवण दिले जात नसल्याची पडताळणी शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी बुधवारी (ता. 30) केली. वॉर्डन सुनील वानखेडे यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्यावर सेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे आणि अन्य कार्यकर्ते भडकले. देऊ का कानामागे असे विचारत दानवे यांनी वानखेडे यांची चांगलीच कानउघाडणी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com