पैशाच्या व्यवहारातून राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याची आत्महत्या; तिघांना अटक

(Fir Filed) सापडलेल्या सुसाईड नोट व मयताचे वडील प्रभाकर दनाने यांच्या फिर्यादीवरून (Three Accused Arrest) तीन आरोपींविरुद्ध आत्महत्यास प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल.
Ncp Activits Suicide
Ncp Activits SuicideSarkarnama
Published on
Updated on

जेवळी-उस्मानाबाद ः राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश सरचिटणीस हणमंत दणाने (वय ३६) यांनी शनिवारी (ता.२५) गळफास लावून घेत अत्महत्या केली. पोलिसांना सापडलेल्या सुसाईड नोट व मयताच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादी वरून आज पहाटे तीन आरोपी विरुद्ध लोहारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी या तिन्ही आरोपींना अटक केली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनूसार वडगाव (गांजा ता. लोहारा) येथील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश सरचिटणीस, तथा वडगाव तंटामुक्त समितीचे अध्यक्ष हणमंत दणाने यांची गावातीलच मायादेवी दत्तात्रय गायकवाड या महिलेशी ओळख होती. अंगणवाडी सेविका म्हणून कामाला असलेल्या या महिलेसोबत दणाने यांनी काही आर्थिक व्यवहार केले आणि तिला दीड लाख रुपये दिले होते.

या पैशाची मागणी जेव्हा केली गेली तेव्हा महिलेने टाळाटाळ सुरू केली, आणि यातून दोघांमध्ये वाद झाले. हा वाद गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी मिटवण्याचा प्रयत्न केला, पण उलट पैसे मागितले म्हणून या महिलेने पती व मुलीसह सहा दिवसांपुर्वी हणमंत दणाने यांना मारहाण केली होती. यामुळे ते मानसिक ताणवाखाली होते.

यातच गुरुवारी (ता.२४) रोजी दणाने हे मायादेवी हिला चार अपत्य असल्याने तिच्याविरुद्ध चौकशी व कार्यवाही करावी, या मागणीसाठी वडगाव येथे उपोषणाला बसले होते. याबत प्रशासकीय अधिकारी यांनी त्यांचे निवेदन स्वीकारून कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्यानंतर त्यांनी उपोषणही मागे घेतले.

परंतु शनिवार (ता२५) सकाळी नऊ वाजता ते नेहमी प्रमाणे चौकातील संपर्क कार्यालयात गेले आणि स्वतःला गळफास लावून घेतला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली तेव्हा टेबलावर त्यांना एक चिठ्ठी (सुसाईड नोट) सापडली. यामध्ये त्यांनी तिघांच्या नावाचा उल्लेख करत त्यांच्या सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून मी आत्महत्या करत असल्याचे म्हटले आहे.

Ncp Activits Suicide
युपीएससीत यश मिळवणाऱ्या बांगरचे कौतुक; खासदार-आमदारांनी खांद्यावर उचलून घेतले

माझ्या मृत्यूस हेच लोक कारणीभूत आहेत. तरी पोलीस प्रशासनाने सखोल चौकशी करुन त्यांच्यावर कारवाई करावी, अशी विनंती देखील पत्रात केली आहे. सापडलेल्या सुसाईड नोट व मयताचे वडील प्रभाकर रामा दनाने (वय ६५) यांच्या फिर्यादीवरून आरोपी मायादेवी दत्तात्रय गायकवाड, तिची मुलगी स्वाती, पती दत्तात्रय, यांच्याविरुद्ध आत्महत्यास प्रवृत्त केल्या प्रकरणी रविवारी (ता २६) लोहारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी या तिन्ही आरोपींना अटक केले असून या प्रकरणाची तपास लोहारा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक आनंदराव वाठोरे हे करीत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com