dhananjay-munde
dhananjay-munde

धसांचा पलटवार; म्हणाले धनंजय मुंडे तोडपाणी करणारे नेते

बीड : " धनंजय मुंडे विरोधी पक्षनेते नसून पक्षविरोधी आणि तोडपाणी करणारे नेते आहेत. त्यांच्या मुंबईच्या शासकीय निवासस्थानी कशाकशाची तोडपाणी चालते याच्या सुरसकथा राज्याला माहित आहेत ," असा पलटवार राष्ट्रवादीचे निलंबीत नेते माजी मंत्री सुरेश धस यांनी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यावर केला आहे.

जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीचे सर्वाधिक सदस्य विजयी झाल्याने पक्षाला सत्ता मिळवण्याची संधी होती. मात्र, ऐनवेळी सुरेश धस यांनी आपल्या पाच समर्थकांनी भाजपला मतदान केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने सुरेश धस यांना बाहेरचा रस्ता दाखवला .  

तेव्हापासून दोघांमध्ये कलगीतुरा रंगत आहेत. मागच्या दारावाटे (विधान परिषदेवर आमदार) पक्षात नेते झाल्याचे यापूर्वी धस मुंडेंना म्हणाले होते. आष्टीत रविवारी अजित पवारांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात धनंजय मुंडे यांनी धसांवर जोरदार टिका आणि गंभीर आरोप केले. 

"राष्ट्रवादीच्या तिकीटावर विजयी झालेले उमेदवार भाजपला देण्यासाठी १५ कोटी रुपये घेतले, नरेंद्र मोदींचा विकास जसा वेडा झाला तसे यांचे होऊ नये ,"असे मुंडे म्हणाले होते. यावर धसांनीही मुंडेंवर पलटवार करत गंभीर आरोप केले आहेत.

 धनंजय मुंडे हे तोडपाणी करणारे नेते असून विरोधी पक्षनेते झाल्यापासून त्यांनी सभागृहात कोणते प्रश्न विचारले, कोणता प्रश्न तडीस नेला? हे जनतेला सांगावे असे आव्हान धसांनी मुंडेंना दिले आहे. 

मुंडेंना तोडपाणीचा काविळ झाल्याने सारे जगच पिवळे दिसत आहे. त्यांच्या त्यांच्या मुंबईतील शासकीय निवासस्थानी चालणाऱ्या तोडपाणीच्या सुरसकथा राज्याला माहित असल्याचा आरोपही सुरेश धस यांनी केला.
 दरम्यान, आपली बदनामी केल्या प्रकरणी आपण न्यायालयात अब्रुनुकसानीचा खटला भरणार असल्याचे धस म्हणाले. त्यामुळे मुंडेंनी आता पळून न जाता आपल्या बोलण्यावर ठाम राहावे असे आव्हानही दिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com