Lok Sabha Election : 1984 च्या लोकसभा निवडणुकीत पराभव, नंतर मिळाला पंतप्रधानाचा मान; कोण होते 'हे' तीन नेते

India Gandhi : 1984 मध्ये इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर देशात काँग्रेसच्या बाजूनं सहानुभूतीची लाट पसरली होती.
sansad
sansadsarkarnama
Published on
Updated on

लोकसभा निवडणूक ( Lok Sabha Election 2024 ) ही अनेकांसाठी प्रतिष्ठेचा विषय असतो. लोकसभेत पराभूत झालेल्यांची राजकारणातील पत कमी होते, असं समजलं जातं. त्यांची राजकीय कारकीर्दही संपुष्टात येण्याचा धोका असतो. त्यामुळेच निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले उमेदवार विजयी होण्यासाठी जंग-जंग पछाडतात. पण, 1984 मधील निवडणुकीत, असे तीन नेते पराभूत झाले होते, जे पुढील बारा वर्षांच्या कालावधीत थेट पंतप्रधानपदी बसले.

1984 मध्ये इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर देशात काँग्रेसच्या बाजूनं सहानुभूतीची लाट पसरली होती. या लाटेत जनता पार्टीचे चंद्रशेखर ( Chandra Shekhar ), अखिल भारतीय जनसंघाचे अटलबिहारी वाजपेयी ( atal bihari vajpayee ), असे दिग्गज नेते पराभूत झाले होते. या निवडणुकीत काँग्रेस पी. व्ही. नरसिंहराव ( pv narasimha rao ) यांच्या रूपानं एकच धक्का बसला होता. नरसिंहराव यांचा आंध्र प्रदेशातील हनमकोंडा मतदारसंघातून पराभव झाला होता. देशात भाजपचे फक्त दोनच खासदार निवडून आले होते. त्यातील एक चेंदूपटला जंगा रेड्डी हे एक होते. त्यांनी नरसिंहराव यांचा पराभव केला होता. त्यासह दक्षिण भारतातून खासदार बनणारे रेड्डी हे भाजपचे पहिले नेते होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

चंद्रशेखर हे आपल्या परंपरागत बलिया मतदारसंघातून रिंगणात उभे होते. त्यांच्याविरोधात काँग्रेसने जगन्नाथ चौधरी यांना मैदानात उतरविले होते. या लढतीत चौधरी यांचा जवळपास 54 हजार मतांनी विजय झाला. जनसंघाचे नेते वाजपेयी हे 1980 च्या निवडणुकीत दिल्लीतून निवडून आले होते. तरीही ते 1984 ला ग्वाल्हेरमधून रिंगणात उतरले. याच मतदारसंघातून ते 1971 ला विजयी झाले होते. या वेळीही विजयी होण्याची त्यांना आशा असताना काँग्रेसने अचानक माधवराव शिंदेंना तिकीट दिले.

sansad
Baramati Lok Sabha Election : बारामतीत यापूर्वीही 'पवार विरुद्ध पवार' संघर्ष घडला होता; काय आहे किस्सा?

या निवडणुकीत वाजपेयींचा पावणे दोन लाख मतांनी पराभव झाला. राजकारणातील वारे कधी बदलतील ते सांगता येत नाही, हे पराभूत झालेल्या या तीन नेत्यांनी दाखवून दिले. 1990 मध्ये विविध राजकीय घडामोडी घडल्या आणि चंद्रशेखर पंतप्रधानपदावर बसले. त्यानंतर पुढच्याच वर्षी पुन्हा केंद्रात काँग्रेसचे सरकार येऊन नरसिंहराव पंतप्रधान झाले. त्यानंतर पाच वर्षांनी 1996 ला देशात प्रथमच भाजपचे सरकार सत्तेवर येत अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान बनले.

R

sansad
Subodh Mohite News: एक विमान हुकले, अन् सुबोध मोहितेंचे राजकीय नशीब रुसले !

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com