Baramati Lok Sabha Election : बारामतीत यापूर्वीही 'पवार विरुद्ध पवार' संघर्ष घडला होता; काय आहे किस्सा?

Sharad Pawar News : 'एकीकडे आपला सख्खा बंधू तर दुसरीडे आपला पक्ष अशी राजकीय अडचण पवारांपुढे येऊन ठेपली.'
Baramati Lok Sabha Election
Baramati Lok Sabha ElectionSarkarnama

Baramati News : लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांच्या बहुतांश जागांवर उमेदवारांची घोषणा झाली आहे. प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. पवार कुटुंबियांचा बालेकिल्ला म्हणून बारामती लोकसभा मतदारसंघ ओळखले जाते. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यापासून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजकीय फारकत घेतल्यानंतर यंदाची बारामतीची निवडणूक सर्वार्थाने वेगळी आहे. यंदा बारामतीत पवार विरुद्ध पवार असा संघर्ष पाहायला मिळत आहे. (Latest Marathi News)

Baramati Lok Sabha Election
NCP Dispute : अजित पवारांना मोठा दिलासा! अवमानाचा ठपका ठेवण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार यांच्या गटाकडून सुनेत्रा पवार या प्रथमच लोकसभेच्या रिंगणात आहे. तर शरद पवार यांच्या गटाकडून विद्यमान खासदार सुप्रिया सुळे पुन्हा एकदा लढत देत आहेत. यामुळे यंदा बारामतीत पवार विरुद्ध पवार असा राजकीय संघर्ष आहे. मात्र बारामतीत पवार विरुद्ध पवार प्रथमच असा सामना पहिल्यांदाच घडत आहे असे नाही. येथून मागे सहा-साडे सहा दशकांआधी असा समाना झाला होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शरद पवार यांच्या मातोश्री शारदाताई या शेतकरी कामगार पक्षात (शेकाप) कार्यरत होत्या. त्यावेळी सर्व पवार कुटुंबिय शेकापसाठी काम करत होते. मात्र शरद पवार पुण्यात शिक्षणासाठी आले होते. या काळात त्यांनी काँग्रेस पक्षात काम करणे सुरु केले होते. महाराष्ट्राचे प्रथम मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे दिग्गज नेते यशवंतराव चव्हाण यांनी पवारांची काँग्रेस युवकच्या सचिवपदी नियुक्ती केली होती.

केशवराव जेधे यांचे निधन अन् बारामतीचा सामना -

केशवराव जेधे हे 1957 साली बारामतीतून निवडून आले होते. मात्र त्यांना लोकप्रतिनिधी म्हणून फार काळ राहता आले नाही. पुढील दोनच वर्षात जेधे यांचे निधन झाले. त्यामुळे 1959 मध्ये या जागेवर पोटनिवडणूक लागली. केशवराव जेधे यांचे मुलगे गुलाब जेधे यांना काँग्रेसने या पोटनिवडणुकीत उमेदवारी दिली.

दुसरीकडे पवार कुटुंबिय ज्या पक्षात होते त्या शेकापने शरद पवार यांचे सख्खे बंधू वसंतराव पवार यांना उमेदवारी दिली. यामुळे शरद पवार यांच्यापुढे धर्मसंकट उभे राहिले. एकीकडे आपला सख्खा बंधू तर दुसरीडे आपला पक्ष अशी राजकीय अडचण पवारांपुढे येऊन ठेपली.

भावाचा पवारांना मोलाचा सल्ला -

शरद पवारांची (Sharad Pawar) ही राजकीय कोंडी त्यांचे सख्खे भाऊ आणि शेकापचे उमेदवार वसंतराव पवार यांनी हेरली. वसंतराव पवार शरद पवारांना म्हणाले, 'आता तू वेगळा राजकीय विचार स्वीकारला आहेस. तर तू जिथे कार्यरत आहेस त्या पक्षाचा, त्या विचारधारेचा प्रचार कर. आमची काहीही हरकत नाही." पवार यांच्या मातोश्री शारदाताईंनीही याबाबत कसलाही आक्षेप घेतला नाही.

Baramati Lok Sabha Election
NCP Crisis News : शरद पवार गटाकडून 'घड्याळ'बाबत याचिका दाखल; अजित पवारांवर घेतला आक्षेप...

पवारांच्या बंधूंचा पराभव -

काँग्रेसने प्रतिष्ठेची केलेल्या लढाईत अखेर काँग्रेसचे (Congress) गुलाब जेधे विजयी झाले. आपल्या राजकीय कारकीर्दीच्या अगदी सुरुवातीलाच पवारांना आपल्या सख्ख्या बंधू यांच्याविरुद्ध प्रचार करावा लागला. आपल्या सख्ख्या बंधूचा पराभवही पवारांना पाहावा लागला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com