K.Chandrasekhar Rao News : केसीआर यांचे लक्ष राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यावर; आघाडीचे गणित बिघडवणार?

KCR Visit Vitthal Rukmini Temple : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी आज महाराष्ट्रात 600 गाड्यांच्या ताक्यासह ग्रँड एन्ट्री झाली.
K.Chandrasekhar Rao News
K.Chandrasekhar Rao NewsSarkarnama
Published on
Updated on

Solapur BRS News : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी आज महाराष्ट्रात 600 गाड्यांच्या ताक्यासह ग्रँड एन्ट्री झाली. केसीआर यांनी मराठवाड्यामध्ये आणि विदर्भात काही सभा घेतल्यानंतर आपला मोर्चा आता पश्चिम महाराष्ट्राकडे वळवला आहे. याची सुरुवात पंढरपुरातून पाडूरंगाच्या चरणी नतमसत्क होऊन करणार आहेत. केसीआर यांच्या पंढरपूर भेटीने राज्यातील राजकारण तापले आहे. तसेच ही महाविकास आघाडीसाठी धोक्याची घंटा असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.

के. चंद्रशेखर राव (K.Chandrasekhar Rao) हे सोमवारी पंढरपूरात दाखल झाले. यावरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. केसीआर यांच्या दौरयावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टीका केली आहे. पंढरपूर दौऱ्यानिमित्ताने केसीआर यांनी पश्चिम महाराष्ट्रात आपला पक्ष रुजवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. पश्चिम महाराष्ट्राची विविध अंगांनी समृद्धी पाहता केसीआर यांनी आपला मोर्चा आता तिकडे वळवला असल्याचे बोलले जात आहे.

K.Chandrasekhar Rao News
KCR In Solapur : केसीआर आपल्या संपूर्ण मंत्रिमंडळासह सोलापुरात दाखल; BRSच्या ४०० नेत्यांसाठी २१० खोल्या बुक

महाराष्ट्रातील (Maharashtra) सध्याची राजकीय अस्थिरता पाहता बीआरएस म्हणजेच भारत राष्ट्र समितीला संधी असल्याचे राव यांना वाटत आहे. तेलंगाणामध्ये शेतकऱ्यांना मोफत वीज आणि पाणी या दोन महत्त्वाच्या गरजा पुरवल्यानंतर शेतकरी कामगार वर्ग हा बीआरएसच्या बाजूने उभा राहिला आहे. त्यामुळेच तेलंगाणामध्ये कें. चंद्रशेखर राव यांचे सरकार आहे. महाराष्ट्रातील किंवा कोणत्याही राज्यातील शेतकऱ्यांना आपल्याकडे वळवायचे असेल तर या दोन महत्त्वाच्या बाबी त्यांना दिल्या तर ते आपल्याकडे वळतील याचा अंदाज असल्याने महाराष्ट्रातील शेतकरी आणि कष्टकरी वर्गाला वळवण्यासाठी केसीआर यांनी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत.

केसीआय यांनी मराठवाड्यासह विदर्भातही जाहीर सभा घेतल्या. या सर्व सभांना प्रतिसाद मिळाला असला तरी अद्यापही पक्षाची पाळमुळे रुजलेली नाहीत. याची त्यांना जाणीव आहे. महाराष्ट्रामध्ये अधिक जोरदारपणे जर आपली पाळंमुळे रुजवायची असतील तर राजकीय दृष्ट्या अतिशय महत्त्वाचा असलेल्या साखरपट्ट्याकडे मोर्चा वळवायला हवा, हे लक्षात आल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रामध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न केसीआर यांनी सुरू केला, असल्याचे राजकीय विश्लेषक आनंद गायकवाड सांगतात.

पश्चिम महाराष्ट्रातील साखर पट्ट्यांमध्ये काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राजकारण उभे आहे. या साखर कारखान्यांच्या आणि सहकार क्षेत्राच्या राजकारणामुळे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला या पाच जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात यश प्राप्त होत असते. अलीकडे शिवसेनेनेही या जिल्ह्यांमध्ये आपला प्रभाव पाडायला सुरुवात केली आहे. तरी प्रामुख्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादीच या जिल्ह्यांमध्ये प्रबळ आहेत. महाराष्ट्रातील राजकारणाला धक्का द्यायचा असेल तर पश्चिम महाराष्ट्रातील काही जागा पदरात पाडून घ्यायला हव्यात हे लक्षात आल्यानंतर केसीआर यांनी आपला मोर्चा पश्चिम महाराष्ट्राकडे वळवला असावा, असे मत राजकीय विश्लेषक अनिकेत जोशी यांनी व्यक्त केले.

K.Chandrasekhar Rao News
BRS News Maharashtra : मुरूम मोडमध्ये उस्मानाबादी शेळीच्या मटणावर ताव मारत केसीआरांचा ताफा निघाला..

पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेस, राष्ट्रवादीचे दुसऱ्या आणि तिसऱ्या फळीचे नेते केसीआर यांच्या संपर्कात आहेत. मात्र, महाविकास आघाडी एकत्रितपणे निवडणुका लढवणार असेल तर अनेक नेते नाराज होण्याची शक्यता आहे. नेत्यांमध्ये बंडखोरी होण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत काही नेते हे केसीआर यांच्या गळाला लागण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) किंवा एकूणच महाविकास आघाडीला धोका निर्माण होऊ शकतो, असे मत राजकीय विश्लेषक जोशी यांनी व्यक्त केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तसेच विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष भगीरथ भालके यांनी अखेर राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करण्याचा निर्णय घेतला आहे. भालके आता भारत राष्ट्र समितीत प्रवेश करणार आहेत. याशिवाय मागील काही महिन्यात बीआरएसमध्ये महाराष्ट्रातील अनेक नावाजलेली लोकं दाखल झाली आहेत. माजी आमदार हर्षवर्धन जाधव, सुरेखा पुणेकर, भगीरथ भालके यांनी बीआरएसमध्ये प्रवेश केला आहे, तसेच विदर्भातील तीन माजी आमदार आणि अनेक कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केला आहे.

K.Chandrasekhar Rao News
BJP News : विदर्भातील ओबीसी नेत्यांची जुळवाजुळव, भाजपचे एक पाऊल पुढे !

पश्चिम महाराष्ट्रात सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर आणि पुणे हे 5 जिल्हे येतात. या 5 जिल्ह्यांवर राष्ट्रवादी काँग्रेसचा म्हणजेच शरद पवार यांचा वरचष्मा आहे. विधानसभेच्या 75 जागा या नेहमीच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पारड्यात पडल्या आहेत. आगामी लोकसभा निवडणुकांचा विचार करता या पाच जिल्ह्यातील लोकसभेच्या जागा अत्यंत महत्त्वाच्या ठरणार आहेत. या जागांवर पकड मिळवण्यासाठी महाविकास आघाडी जोरदार प्रयत्न करीत आहे. मात्र, केसीआर यांचा या भागात झालेल्या प्रवेशामुळे आघाडीसमोर आव्हान असणार आहे, असे मत राजकीय विश्लेषक विवेक भावसार यांनी व्यक्त केले आहे.

एकूणच केसीआर यांच्या पश्चिम महाराष्ट्रातील खेळीला कसा प्रतिसाद मिळतो यावर राज्यातील आगामी निवडणुकांचे राजकारण अवलंबून असणार आहे. सध्या तरी केसीआर यांना फारसा प्रतिसाद मिळताना दिसत नाही. मात्र निवडणुका जवळ येतील तसे चित्र बदलू शकते असेही भावसार यांनी सांगितले.

मराठवाड्यातील आणि विदर्भातील शेतकऱ्यांना पक्षात येण्याचे आवाहन करत असताना पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांपर्यंत पोहचण्याचा केसीआर यांचा प्रयत्न आहे. तेलंगाणा राष्ट्र समितीचे नाव बदलून त्यांनी भारत राष्ट्र समिती केले आहे. देशाच्या राजकारणात एक सक्षम पर्याय उभा करण्याचा केसीआर यांचा मानस दिसून येत आहे. या लढाईची सुरुवात त्यांनी महाराष्ट्रातून केली आहे. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा, लोकसभा निवडणुका बीआरएस लढवणार आहे. भाजपा-शिंदे गट आणि महाविकास आघाडी यांच्यापुढे आव्हान निर्माण करण्याची रणनीती आखत आहेत, असे सांगण्यात येत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com