BRS News Maharashtra : मुरूम मोडमध्ये उस्मानाबादी शेळीच्या मटणावर ताव मारत केसीआरांचा ताफा निघाला..

K.Chandrashekhar Rao) जहिराबादच्या खासदार व काही मोजके स्थानिक कार्यकर्त्यांनी जेवणाची व्यवस्था निटनेटकी होण्यासाठी प्रयत्न केले.
BRS News Maharashtra
BRS News Maharashtra Sarkarnama
Published on
Updated on

Marathwada : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचा महाराष्ट्रात पक्ष वाढीचा आटापिटा सुरु आहे. आषाढी वारीच्या निमित्ताने पंढरपुरचा दौरा, त्यासोबतच तुळजापूरच्या भवानी मातेच्या दर्शनासाठी सोमवारी (ता. २६) हैद्राबादहुन मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याचा ताफा उमरगा येथून गेला. (BRS News Maharashtra) मुरुम मोड येथील महालिंगराया सभागृहात मंत्री, खासदार, आमदार व पदाधिकारी यांच्यासाठी शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची शाही व्यवस्था करण्यात आली होती.

BRS News Maharashtra
BRS News : बीआरएसला हलक्यात घेणारे पक्ष आता झाले अलर्ट...

सोमवारी दुपारी दोन वाजता तेलंगणा राज्याच्या मंत्रिमंडळातील पंधरा मंत्री, भारत राष्ट्र समितीचे खासदार, आमदार चकाचक गाड्यातून मरुम मोडमध्ये दाखल झाले. (K.Chandrashekhar Rao) या ताफ्यातील सर्व गाड्या या आलिशान होत्या. फॉर्चूनर कंपनीच्या गाड्यांची यात संख्या अधिक होती, बीएमडब्लू कारही होत्या. (Marathwada) मुख्यमंत्री यांच्यासाठी विशेष कोच ट्रॅव्हल होती. रस्त्याच्या दुतर्फा हा ताफा पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.

महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी थांबवण्यात आली होती. दुपारी दोन वाजता मुरुम मोडच्या महालिंगराया मंगल कार्यालयात सर्वांनी जेवणाचा आस्वाद घेतला. (Maharashtra) त्यानंतर मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी येणेगूरसह कांही भागातील तरुण कार्यकर्त्यांशी चर्चा केली. राव यांच्या गावाशेजारील अल्लीपूरच्या सरपंच राजाबाई बंडीपल्ली दौऱ्यात होत्या.

तेलंगणातील रहिवाशी असलेले व व्यवसायानिमित्त येणेगूर, किल्लारी येथे स्थायिक झालेले राजेश बोडगे, चंद्रकांत बोडगे, चेतन बोडगे यांनी मुख्यमंत्र्याची भेट घेतली. मुरुम मोड, जळकोट, नळदुर्ग येथे भारत राष्ट्र समितीच्या पक्ष चिन्ह असलेल्या गुलाबी झेंडयाचा आणि बॅनरचा मोठा झगमगाट दिसून आला. या पक्षात धाराशिव जिल्ह्यातील मोठे नेते बीआरएसच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे.

मनसेचे प्रशांत नवगिरे यांच्यासह उमरग्यातील प्रहार संघटनेचे राचय्या स्वामी यांच्यासारखे कांही कार्यकर्ते या पक्षात दाखल झाले आहेत. दरम्यान मुरूम मोड येथेच जेवणाच्या व्यवस्थेचे नियोजन करण्यामागे नेमका कोणता हेतू होता, याबाबत चर्चा होती. जहिराबादच्या खासदार व काही मोजके स्थानिक कार्यकर्त्यांनी जेवणाची व्यवस्था निटनेटकी होण्यासाठी प्रयत्न केले. मात्र उस्मानाबादी शेळीच्या मासांहरी जेवणाचा बेत आणि पंढरपुर वारी या समीकरणाविषयी चर्चा रंगली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com