संभाजीराजेंच्या हाती केवळ काही तास... पुरती कोंडी झालीय!

शिवबंधन बांधल्याशिवाय राज्यसभा न देण्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) ठाम
Pawar-Sambhajiraje-Raut
Pawar-Sambhajiraje-Rautsarkarnama
Published on
Updated on

माजी खासदार संभाजीराजे (Sambhjai raje) यांच्या राज्यसभा उमेदवारीचा तिढा सुटला आहे, असे वाटत असतानाच त्यात ट्विस्ट आला. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिवसेनेत येणार असाल तरच राज्यसभा निवडणुकीत पाठिंबा गृहित धरा, अशी ठाम भूमिका घेतली. एवढेच नाही तर सोमवारी (ता. २३) शिवबंधन बांधण्यासाठी दुपारी बारा वाजता `मातोश्री`वर या असा निरोप दिला. दुपारी बाराच्या वेळेचे बंधनही संभाजीराजेंना या निमित्ताने दिले. दुसरीकडे संभाजीराजे यांनीही अपक्ष म्हणूनच राज्यसभा निवडणूक लढविण्याचा आपला पवित्रा कायम ठेवला. त्यामुळे सध्या तरी संभाजीराजे यांची कोंडी झाली आहे. उमेदवारी अर्ज भरण्याएवढे दहा अपक्ष आमदार तरी सूचक म्हणून मिळतील का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. (Sambhajiraje news update)

Pawar-Sambhajiraje-Raut
उद्धव ठाकरे आणि संभाजीराजे समेट : शिवसेना पुरस्कृत म्हणून राज्यसभेत जाणार

संभाजीराजेंच्या समर्थकांसाठी ही लढाई सोपी वाटत होती. महाविकास आघाडीने पाठिंबा दिला नाही तर भाजपकडील २२ मते आणि अपक्ष आमदारांचा पाठिंबा या जिवावर आपण लढून येऊ, असे चित्र होते. तसेच महाविकास आघाडीतील नेते हे एका छत्रपतींचा अनादर करणार नाहीत. ते पण पाठिंबा देतील, असे त्यांना वाटत होते. प्रत्यक्षात राष्ट्रवादी काॅंग्रेसने थेट पाठिंबा देण्याची भूमिका घेतली नाही. शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा देऊ असे सांगत ठाकरे यांच्याच भूमिकेची री ओढली. दुसरीकडे काॅंग्रेसकडे त्यांच्या उमेदवाराला मते दिल्यानंतर दोनपेक्षा जास्त मते नाहीत. त्यामुळे काॅंग्रेसने पाठिंबा दिला अथवा नाकारला, असे काहीच केले नाही.

संभाजीराजेंचे मन वळविण्यासाठी शिवसेनेचे मंत्री उदय सामंत, खासदार अनिल देसाई आणि सचिव मिलिंद नार्वेकर त्यांना आज मुंबईत भेटले. खासदार संजय राऊत यांनीही त्यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. तरीही संभाजीराजेंनी आपण शिवसेनेत येणार असल्याबद्दल अनुकूल भूमिका व्यक्त केली नाही. त्यामुळे शिवसेनेने सोमवारी दुपारी बारापर्यंत मातोश्रीवर या, असा निरोप घेऊन राजेंना टायमिंग सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार संभाजीराजे शिवसेनेत जाण्याविषयी अद्याप प्रतिकूलच आहेत.

Pawar-Sambhajiraje-Raut
संभाजीराजे-सेना नवा ट्विस्ट : दुपारी बारापर्यंत `शिवबंधन` बांधण्याची मुदत; अन्यथा...

त्यांना स्वराज नावाची संघटना काढायची आहे. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांचे हे स्वप्न भंगणार आहे. या संघटनेच्या माध्यमातून आपली महाराष्ट्रात राजकीय ताकद निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. आमच्या पाठिंब्यावर राज्यसभेत जायचे आणि आमच्याच विरोधात संघटना काढायची, हा काही मुद्दा महाविकास आघाडीच्या नेत्यांना पटली नाही. तसेच तुम्ही सर्वपक्षीय म्हणून वावरणार असाल तर त्याचा आम्हाला काय उपयोग, असाही शिवसेनेचा सवाल आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका ठाम ठेवत संभाजीराजेंची पुरती कोंडी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com