गावातील सगळ्या महिलांचे कपडे धुण्याची शिक्षा सुनावून न्यायाधीशच आले अडचणीत

बलात्काराचा प्रयत्न करण्यास शिक्षा म्हणून सहा महिने गावातील महिलांचे कपडे धुऊन त्याला इस्त्री करण्याची शिक्षा न्यायाधीशांनी दिली होती.
Court
CourtFile Photo
Published on
Updated on

पाटणा : बिहार (Bihar) राज्यातील मधुबनी येथील न्यायालयाने बलात्काराचा प्रयत्न करण्यास शिक्षा म्हणून सहा महिने गावातील महिलांचे कपडे धुऊन त्याला इस्त्री करण्याची शिक्षा दिली होती. आरोपीला जामीन (Bail) देताना न्यायालयाने हे आदेश दिले होते. हा अजब निर्णय न्यायाधीशांना (Judge) महागात पडला आहे. आता त्यांना काम करण्यापासून रोखण्याचा प्रशासकीय आदेश काढण्यात आला आहे.

मधुबनीमधील झांझरपूर न्यायालयातील अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश अविनाश कुमार यांनी आरोपीला जामीन मंजूर करताना हा आदेश दिला होता. लालन कुमार सफी असं आरोपीचं नाव आहे. गावातील महिलांची कपडे पुढील सहा महिने मोफत धुवून देण्याच्या अटीवर त्याला जामीन देण्यात आला होता. उच्च न्यायालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उच्च न्यायालयाने अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश अविनाश कुमार यांच्याबाबत आदेश काढला आहे. यानुसार, पुढील आदेश मिळेपर्यंत कोणतीही न्यायालयीन जबाबदारी घेऊ नये, असे त्यांना सांगण्यात आले आहे.

वीस वर्षांचा लालन हा धोबी आहे. बलात्काराचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली त्याला एप्रिल महिन्यात अटक करण्यात आली आहे. तेव्हापासून तो कोठडीत होता. त्याच्या वकिलाने न्यायालयात बाजू मांडताना तो वीस वर्षांचा असल्याने त्याला माफ करण्याची मागणी केली होती. तसेच आरोपीला त्याच्या व्यावसायिक कामातून समाजाची सेवा करण्याची तयारी असल्याचंही वकील म्हणाले होते. वकिलांचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर न्यायालयानं संबंधित आरोपीला जामीन मंजूर केला. पण हा जामीन देताना त्यांनी आरोपीला गावातील सर्व महिलांचे कपडे धुवून व इस्त्री करून देण्याची शिक्षा दिली आहे. तसेच प्रत्येकी दहा हजार रुपयांचे दोन हमीपत्रांवर जामीन देण्यात आला.

Court
मंत्रिमंडळ विस्ताराला अखेर मुहूर्त; 5 जणांना डच्चू अन् 7 नवीन चेहऱ्यांना संधी?

आरोपीविरोधी दोषारोपपत्र दाखल करण्यात आलं असून पोलिसांचा तपासही पूर्ण झाला आहे. तसेच दोन्ही बाजून समझोत्यासाठी अर्जही करण्यात आला आहे. सहा महिन्यांनी संबंधित आरोपीला मोफत सेवा दिल्याचे प्रमाणपत्र गावातील सरपंच किंवा कोणत्याही सरकारी अधिकाऱ्याकडून घ्यावे लागणार आहे. अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश अविनाश कुमार यांनी यापूर्वीही असे निकाल दिले आहेत. एका लॉकडाऊनच्या काळात शाळा सुरू केली म्हणून एका शिक्षकाला न्यायाधीशांना गावामध्ये मुलांना मोफत शिकवण्याची शिक्षा दिली होती. या शिक्षकाविरोधात ऑगस्ट 2021 मध्ये गुन्हा दाखल झाला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com