भाजप सोडण्याचं कारण विचारताच माजी केंद्रीय मंत्र्यांनी दाखवलं मेस्सीकडं बोट

माजी केंद्रीय मंत्री असलेल्या खासदार बाबुल सुप्रियो यांनी नुकताच भाजपला धक्का देत तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
Babul Supriyo with Narendra Modi
Babul Supriyo with Narendra ModiFile Photo
Published on
Updated on

कोलकता : माजी केंद्रीय मंत्री असलेल्या खासदार बाबुल सुप्रियो (Babul Supriyo) यांनी नुकताच भाजपला (BJP) धक्का देत तृणमूल काँग्रेसमध्ये (TMC) प्रवेश केला. भाजप सोडण्याचे कारण विचारताच त्यांनी प्रसिद्ध फुटबॉलपटू लियोनेल मेस्सी याच्याकडे बोट दाखवले आहे.

सुप्रियो यांनी नुकताच तृणमूल काँग्रेसचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांच्या उपस्थितीत तृणमूलमध्ये प्रवेश केला. भाजप सोडून तृणमूलमध्ये प्रवेश करणारे ते पाचवे नेते ठरले आहेत. त्यांच्या आधी 4 भाजप आमदारांनी तृणमूलमध्ये प्रवेश केला होता. सुप्रियो यांच्याकडे पर्यावरण मंत्रालयाचे राज्यमंत्रिपद होते. त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा देण्यास सांगण्यात आले होते. यानंतर दोनच महिन्यांत त्यांनी तृणमूलमध्ये प्रवेश करुन भाजपला धक्का दिला होता.

भाजप सोडण्याचे कारण विचारताच सुप्रियो म्हणाले की, माझे स्वागत करणाऱ्या आणि मला ११ जणांमध्ये स्थान देणाऱ्या संघाचा मला हिस्सा व्हायचे होते. खरेतर मेस्सीलाही बार्सिलोना सोडायचा नव्हता. वेळच अशी आली की त्याला पत्रकार परिषदेत अश्रू आवरता आले नाहीत. नंतर तो पीएसजीकडे गेला. आता तो पीएसजीसाठी खेळताना मनातून बार्सिलोनाचा असेल, अशी अपेक्षा आपण करायची का? जुन्या संघातील खेळांडूंशी निष्ठा दाखवण्यासाठी तो गोलपोस्टसमोर नुसतात उभा राहील का?

मी कोणत्याही संघाकडून खेळलो तरी त्या संघासाठी मी रक्त आणि घाम गाळेन. जनतेच्या पैशातून पगार घेऊन केवळ खुर्ची गरम करणारा मी नाही. मला खेळण्यासाठी मैदानात उतरवेल त्या संघाचा मला सहभागी व्हायचे आहे. त्यामुळे मी तुम्हाला फुटबॉलचे उदाहरण दिले आहे, असेही सुप्रियो यांनी स्पष्ट केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाचा मेगाविस्तार करताना 12 मंत्र्यांना डच्चू दिला होता. यामध्ये पश्चिम बंगालमधील भाजप खासदार बाबुल सुप्रियो यांचाही समावेश होता. मंत्रिमंडळातून वगळण्यात आल्यानंतर सुप्रियो यांनी केलेल्या फेसबुक पोस्टवरुन गदारोळ उडाला होता. त्यांनी राजकारणातून संन्यास घेतल्याचे जाहीर केले होते. तसेच, खासदारकीचाही राजीनामा देण्याचीही घोषणा केली होती. नंतर त्यांनी खासदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय मागे घेतला होता. अशा प्रकारे त्यांनी पक्षालाच तोंडावर पाडले होते.

Babul Supriyo with Narendra Modi
दोन महिन्यांनी नवरा तुरूंगातून सुटला अन् शिल्पा म्हणाली...

पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह संपूर्ण केंद्रीय मंत्रिमंडळ उतरले होते. तरीही भाजपला पराभव पत्करावा लागला होता. आता राज्यातील तीन विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुका होत आहेत. भवानीपूर या ममतांचा पारंपरिक मतदारसंघ आहे. त्यांना मुख्यमंत्रिपदी कायम राहण्यासाठी ही निवडणूक जिंकणे आवश्यक आहे. यामुळे त्यांचासाठी ही निर्णायक निवडणूक आहे. भाजपनेही ममतांचा पराभव करण्याचा चंग बांधला आहे. या निवडणुकीसाठी भाजपने सुप्रियो यांना स्टार प्रचारक नेमले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com