शिवसेनेचा खडसेंना मोठा धक्का! बोदवड, मुक्ताईनगरातील 14 नगरसेवक शिवबंधनात

शिवसेनेने बोदवड आणि मुक्ताईनगरमध्ये खडसेंना मोठा झटका दिला आहे. या दोन्ही नगरपंचायतींमध्ये शिवसेनेचे पक्षीय बलाबल झाले 10 : 10 असे झाले आहे.
Shivsena
Shivsena
Published on
Updated on

जळगाव : बोदवड (Bodwad) नगरपंचायतीमधील भाजपचे 4, राष्ट्रवादी काँग्रेसचे 2, काँग्रेस 2 अपक्ष 2 असे 10 नगराध्यक्षासह नगरसेवक शिवसेनेत (Shivsena) शिवबंधन बांधून प्रवेश घेतला आहे. मुंबई येथे वर्षा बगल्यावर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. शिवसेनेकडून राष्ट्रवादीचे (NCP) नेते माजी मंत्री एकनाथ खडसेंना (Eknath Khadse) जोरदार धक्का देण्यात आला आहे. दरम्यान, मुक्ताईनगर (Muktainagar) नगरपंचायतीमधील भाजपच्या गटनेत्यासह चार नगरसेवकांनी आज शिवसेनेत प्रवेश केला.

बोदवड आणि मुक्ताईनगर या दोन्ही नगरपंचायतींमध्ये शिवसेनेचे पक्षीय बलाबल झाले 10 : 10 असे झाले आहे. या दोन्ही नगरपंचायतीवर भाजपची सत्ता असली तरी आज शिवसेनेत प्रवेश करणारे दोन्हीकडील भाजप नगरसेवक हे खडसे समर्थक आहेत. त्यांनी खडसेंसोबत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. परंतु, ते भाजपच्या चिन्हावर निवडून आल्याने त्याच पक्षाचे नगरसेवक मानले जात होते. आता शिवसेनेने बोदवड आणि मुक्ताईनगरमध्ये खडसेंना मोठा झटका दिला आहे. काही महिन्यांपूर्वी मुक्ताईनगरातील ६ नगरसेवकांना प्रवेश देऊन शिवसेनेने माजी मंत्री खडसेना जबरदस्त झटका दिला होता. त्यातच पुन्हा शिवसेनेने खडसेंना दुसरा धक्का दिला. बोदवड नगरपंचायतच्या नगराध्यक्षा मुमताज बी सईद बागवान यांच्यासह 10 नगरसेवकांनी आज शिवसेनेत प्रवेश केला.

शिवसेनेत प्रवेश करणारे बोदवडमधील नगरसेवक

नगराध्यक्षा मुमताजबी सईद बागवान, नगरसेवक देवेंद्र समाधान खेवलकर, आफरिन सय्यद असलम बागवान, सुशीलाबाई मधुकर खाटीक, अकबर बेग मिर्झा, सुशिलाबाई आनंदा पाटील , नितीन रमेश चव्हाण, सुनील कडू बोरसे , साकीनाबी शे.कलिम कुरेशी, आसमाबी शे.इरफान

मुक्ताईनगर येथील दुसरा गटनेता देखील गळाला

काही महिन्यांपूर्वी मुक्ताईनगर नगरपंचायतीत खडसेंनी स्थापन केलेल्या निर्विवाद सत्तेला सुरुंग लावत शिवसेनेने भाजप गटनेत्यांसह तब्बल ६ नगरसेवकांना शिवसेनेत प्रवेश दिला होता. हा प्रवेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच दिला होता. मात्र खडसे यांनी ओळख परेड करीत त्यांनी नगरसेवक त्यांच्या ताब्यात असल्याचा दावा केला होता. यानंतर शिवसेनेत प्रवेश केलेल्या गटनेत्याच्या जागेवर निलेश प्रभाकर शिरसाठ यांची निवड खडसेंनी केली होती. यानंतर काही दिवसांतच शिवसेनेने भाजपचा दुसरा गटनेताही गळाला लावला आहे. गटनेता निलेश प्रभाकर शिरसाठ यांच्यासह चार नगरसेवकांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे.

शिवसेनेचे बोदवड व मुक्ताईनगरात पक्षीय बलाबल झाले 10 :10

आज बोदवड येथील नगराध्यक्षा व 9 नगरसेवक असे एकूण 10 सत्ताधारी शिवसेनेत सामील झाले आहेत. मुक्ताईनगर नगरपंचायतीत शिवसेनेचे अधिकृत 3 नगरसेवक निवडून आलेले होते व सहा नगरसेवकांनी याआधी प्रवेश केला होता. यामुळे एकूण 17 पैकी 9 पक्षीय असे बहुमताचे बलाबल शिवसेनेचे येथे झाले होते.आता निलेश शिरसाठ यांच्या प्रवेशाने शिवसेनेचे मुक्ताईनगर नगरपंचायतीतील पक्षीय बलाबल 10 वर आलेले आहे. यामुळे मुक्ताईनगर व बोदवड या दोघे नगरपंचायतीचा विचार करता शिवसेनेचा 10 :10 आकडा दिसून येत आहे.

Shivsena
भाजपमध्ये वाद पेटला; पक्षाच्या बैठकीला वसुंधरा राजेंसह दोन केंद्रीय मंत्र्यांची दांडी

या नगरसेवकांचा प्रवेश सोहळा मातोश्रीवर मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पार पडला. या वेळी राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे , राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील तसेच शिवसेना तालुका प्रमुख छोटू भोई, विधानसभा क्षेत्रप्रमुख सुनील पाटील , गटनेता तथा शहरप्रमुख राजेंद्र हिवराळे, नगरसेवक पियुष मोरे, मुकेश वानखेडे, आरिफ आझाद, दीपक संतोष माळी, अफसर खान, जमील बागवान, मोहसीन बागवान, रितेश सोनार आदींची उपस्थिती होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com