नवी दिल्ली : राजस्थानचे (Rajasthan) मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) आणि सचिन पायलट (Sachin Pilot) यांच्यातील वाद सुरूच आहे. पंजाबमधील पक्षांतर्गत वादावर तोडगा काढल्यानंतर काँग्रेस (Congress) नेतृत्वाने राजस्थानवर लक्ष केंद्रित केले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांनी पायलट यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. या आठवड्यातील ही दुसरी अशी भेट आहे.
राज्यातील काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या वादावर तोडगा काढण्याची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली आहे. पायलट यांना पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वात महत्वाचे पद देण्याचा प्रस्ताव आहे. पुढील वर्षी गुजरातमध्ये विधानसभा निवडणूक होत आहे. काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांसाठी हे राज्य महत्वाचे आहे. यामुळे गांधी भावंडांसोबत पायलट यांची काल बैठक झाली. ही बैठक सुमारे पाऊण तास चालली. या बैठकीत पायलट यांच्या समर्थकांना राजस्थानच्या मंत्रिमंडळात प्राधान्य देण्याची हमीही देण्यात आली. परंतु, पायलट यांनी गुजरातवर लक्ष केंद्रित करावे, असे त्यांना सांगण्यात आले, अशी माहिती सूत्रांनी दिली.
पंजाबमध्ये काँग्रेसने अमरिंदरसिंग यांना हटवून चरणजितसिंग चन्नी यांना मुख्यमंत्री बनवले आहे. राजस्थानप्रमाणेच पंजाबमध्ये अंतर्गत संघर्ष सुरू होता. पंजाबमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री अमरिंदरसिंग आणि प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांच्यात वाद सुरू होता. अखेर यात अमरिंदरसिंग यांना मुख्यमंत्रिपदावर पाणी सोडावे लागले. आता पंजाबनंतर काँग्रेस नेतृत्वाने राजस्थानकडे लक्ष वळवले आहे. पक्षांतर्गत वाद मिटवण्यासाठी काँग्रेस नेतृत्वाने पावले उचलण्यास सुरवात केली आहे.
मागील काही दिवसांपासून गेहलोत आणि पाललट गटामध्ये संघर्ष वाढला होता. काही दिवसांपूर्वी सचिन पायलट हे दिल्लीतही गेले होते. त्यांनी केलेल्या मागण्यांवर वर्षभरानंतरही पक्षाने निर्णय न घेतल्याने ते नाराज आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रभारी अजय माकन हे नुकतेच राज्यात दाखल झाले होते. त्यांची गेहलोत यांच्यासह पायलट गटाचीही बैठक घेतली होती. पायलट समर्थकांना पक्ष संघटनेत आणि सरकारमध्ये स्थान देण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली होती. यातच सिद्धू यांचे बंड पंजाबमध्ये यशस्वी पायलट यांनी पक्ष नेतृत्वावर दबाव टाकण्यास सुरवात केली आहे.
पायलट यांनी मंत्रिमंडळात समर्थक आमदारांना जास्त प्रतिनिधित्व मिळावे, अशी मागणी लावून धरली आहे. परंतु, मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी याला विरोध केला आहे. राजस्थानध्ये मंत्रिमंडळात 30 पर्यंत मंत्री असू शकतात. सध्या मुख्यमंत्री गेहलोत यांच्यासह 21 मंत्री आहेत. सरकारमध्ये सध्या 9 मंत्रिपदे रिक्त आहेत. पायलट यांनी ही सर्व मंत्रिपदे समर्थकांसाठी मागितली आहेत. मात्र, मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी याला नकार दिला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.