मोदी-शहांनी गुजरातच्या नव्या मुख्यमंत्र्यांना दिलं मोठं टार्गेट

गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाची धुरा भूपेंद्र पटेल यांनी हाती घेतली आहे. त्यानंतर त्यांना दिल्लीत पाचारण करण्यात आले होते.
Bhupendra Patel, Narendra Modi, Amit Shah
Bhupendra Patel, Narendra Modi, Amit ShahFile Photo
Published on
Updated on

नवी दिल्ली : गुजरातच्या (Gujarat) मुख्यमंत्रिपदाची (Chief Minister) धुरा भूपेंद्र पटेल (Bhupendra Patel) यांनी हाती घेतली आहे. त्यानंतर त्यांना दिल्लीत पाचारण करण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांची भेट त्यांनी घेतली. आधीचे मुख्यमंत्री विजय रूपानी यांनी केलेल्या चुका टाळण्याची ताकीद मोदी, शहांनी पटेलांना दिली आहे. त्याचबरोबर आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्यांना मोठे उद्दिष्ट्यही दिले आहे.

विजय रुपानी यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांनी सर्वांनाच धक्का दिला. पहिल्यांदाच आमदार झालेले भूपेंद्र पटेल यांच्या खांद्यावर मुख्यमंत्रिपदाची महत्वाची जबाबदारी देण्यात आली. रुपानी यांच्या मंत्रिमंडळातील एकाही मंत्र्याला पटेल यांच्या मंत्रिमंडळात संधी दिली नाही. गुजरातमधील नेत्यांसाठी हा दुसरा धक्का होता. पटेल यांच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी आणि खातेवाटप झाल्यानंतर त्यांना दिल्लीला पाचारण करण्यात आले होते.

नुकताच पटेल यांचा दिल्ली दौरा झाला. या दौऱ्यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या भेटीत मोदी आणि शहांनी पटेल यांना काही उद्दिष्ट्ये दिली आहेत. राज्यात पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होत असून, या दृष्टीने पटेल यांच्या खांद्यावर अपेक्षांचे ओझे आहे. राज्यातील प्रलंबित प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश नेतृत्वाने पटेल यांना दिले आहेत. याचबरोबर नोकरशाहीत मोठे बदल करून जनतेत सरकारची प्रतिमा सुधारण्यासही त्यांना सांगण्यात आले आहे.

कोरोना महामारीच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री विजय रुपानी यांच्या ढिलाईमुळे सरकारच्या प्रतिमेला धक्का बसला आहे. यामुळे तातडीने राज्यातील नोकरशाहीत बदल करण्याची सूचना करण्यात आली आहे. राज्यातील जनतेचे सरकार ऐकत आहे, अशी प्रतिमा बनवावी, असेही पटेल यांना सांगण्यात आले आहे. गुजरातची राजधानी गांधीनगरमध्ये 3 ऑक्टोबरला स्थानिक निवडणुका आहेत. याचबरोबर दोन आठवड्यांत विधानसभेचे पावसाळी अधिवेशन बोलावण्यात आले आहे. यावर पक्षाचे प्रामुख्याने लक्ष आहे. यामुळे प्रलंबित योजना मार्गी लावून त्यांचे श्रेय घ्यावे, असेही त्यांना सुचवण्यात आले आहे. मोदी-शहांनी पटेल यांना अॅक्शन मोडवर काम करण्यास सांगितले आहे, असेही सूत्रांनी स्पष्ट केले.

Bhupendra Patel, Narendra Modi, Amit Shah
मोदी सरकार देणार आणखी एक धक्का! एलपीजी सबसिडी होणार बंद

पटेल यांच्या मंत्रिमंडळाचा नुकताच शपथविधी झाला. त्याच दिवशी पटेल यांनी मंत्रिमंडळाची पहिली बैठकही घेतली होती आणि त्याच रात्री खातेवाटप जाहीर केले होते. यामध्ये मुख्यमंत्र्यांनी स्वत:कडे दुसऱ्या क्रमांकाचं महत्वाचे गृह खाते ठेवले आहे. तसेच सामान्य प्रशासन, माहिती व प्रसारण, उद्योग, खाणी व खनिजे, नगर विकास, शहरी गृहनिर्माण, नर्मदा व बंदरे आदी नऊ खातीही त्यांच्याकडे आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com