काँग्रेसच्या खासदारांसमोरच नेत्यांची खुर्च्यांनी मारामारी अन् अखेर पोलिसांचा दंडुका

काँग्रेसमध्ये अंतर्गत मतभेद उफाळून आले असून, यामुळे जोरदार संघर्ष झाला.
Congress
CongressANI
Published on
Updated on

शिवगंगा : काँग्रेसमध्ये (Congress) अंतर्गत मतभेद उफाळून आले असून, यामुळे जोरदार संघर्ष झाला. स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांची रणनीती ठरवण्यासाठी आयोजित पक्षाच्या बैठकीत नेते आणि कार्यकर्ते भिडले. या वेळी एकमेकांना खुर्च्यांनी मारहाण करण्यात आली. यामुळे पक्षाची बैठकच रणभूमी बनली होती. या बैठकीला उपस्थित असलेल्या खासदारांसमोरच हा तमाशा सुरू होता.

तमिळनाडूतील शिवगंगा जिल्ह्यात हा प्रकार घडला आहे. या बैठकीला माजी केंद्रीय मंत्री पी.चिदंबरम यांचे पुत्र कार्ती चिदंबरम (Karti Chidambaram) हे उपस्थित होते. कार्ती हे शिवगंगा लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी आज बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीतच हा गोंधळ झाला. चिदंबरम यांच्यासमोर नेत्यांमध्ये जोरदार हाणामारी सुरू होती.

या घटनेचे व्हिडीओही समोर आले आहेत. यात अनेक जण एकमेकांना प्लॅस्टिकच्या खुर्च्यांना मारहाण करताना दिसत आहेत. सभागृहाच्या दरवाजाजवळ असलेले काही जण त्यांचा पाठलाग करतानाही दिसत आहेत. काँग्रेसच्या दोन गटांतील मतभेद उफाळून हा संघर्ष झाल्याचे समोर येत आहे. अखेर पोलिसांना या प्रकरणी हस्तक्षेप करावा लागला. पोलिसांनी सगळ्यांना सभागृहातून बाहेर काढल्यानंतर गोंधळ शांत झाला.

Congress
काँग्रेसचा तरुण चेहरा : राष्ट्रीय पातळीवरील दोन नेते पुढील आठवड्यात पक्षात

पक्षाचे काही स्थानिक पदाधिकारी आणि नेत्यांना हटवावे, अशी मागणी कार्यकर्ते करीत आहेत. पक्षाला भक्कम करण्यासाठी पदाधिकारी आणि नेत्यांवर कारवाई करावी, यासाठी कार्यकर्ते आक्रमक झाले होते. तमिळनाडूतील 28 जिल्ह्यांमध्ये स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुका 9 ऑक्टोबरला होत आहेत. काही दिवसांपूर्वी काँग्रेसमधील गोंधळाचा असाच एक व्हिडीओ समोर आला होता. त्यात पी.चिदंबरम हे पक्ष कार्यकर्त्यांशी वाद घालताना दिसत होता. त्यावेळीही स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका हाच वादाचा विषय होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com