अखेर ठरलं! आता सोमय्या म्हणाले, मी पुन्हा येणार...

सोमय्या यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कुटुंबावर १२७ कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे.
Kirit Somaiya
Kirit SomaiyaSarkarnama

मुंबई : भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांना दोन दिवसांपूर्वी कोल्हापूर जिल्ह्यात प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली होती. पण त्यानंतरही ते रेल्वेने कऱ्हाडपर्यंत गेले. तिथे पोलिसांनी त्यांना अडवलं अन् पुन्हा मुंबईला पाठवलं होतं. पण आता पुन्हा सोमय्या यांनी कोल्हापूरचा दौरा निश्चित केला आहे. तसं पत्र त्यांनी जिल्हाधिकारी व पोलिस अधिक्षकांना लिहिलं आहे.

सोमय्या यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर १२७ कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. त्या संदर्भात त्यांनी ईडी, सीबीआय या संस्थाकडेही त्यांची तक्रार केली आहे. सोमय्या हे सोमवारी (ता. २० सप्टेंबर) कोल्हापूरला जाऊन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या घोरपडे कारखान्यासह कागल मतदारसंघात काही ठिकाणीही भेट देणार होते. मात्र, त्यांच्या जीवाला धोका असल्याचे कारण देत जिल्हा प्रशासनानं सोमय्या यांना कोल्हापूरात जिल्हाबंदी केली. त्यासाठी आदल्यादिवशी त्यांच्या मुंबईतील घराबाहेर त्यांना थांबवण्यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.

Kirit Somaiya
अनिल परबांनी सोमय्यांना दिलेला इशारा खरा करून दाखवला!

त्यानंतरही सोमय्या रात्री सीएसटी रेल्वे स्थानक दाखल झाले. तिथेही पोलिसांना त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. पण सोमय्या यांचा आक्रमक पवित्रा पाहून पोलिसांनी त्यांना जाऊ दिले. अखेर दुसऱ्या दिवशी पहाटे ते कऱ्हाडमध्ये दाखल होताच खाली उतरवण्यात आले. तिथूनच पोलिसांनी त्यांना पुन्हा मुंबईला परत पाठवले. पण आता पुन्हा एकदा सोमय्या यांनी येत्या 28 तारखेला कोल्हापूरला जाणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.

सोमय्या यांनी ट्विटरवरून कोल्हापूर दौऱ्याची माहिती दिली आहे. याबाबतचे पत्र त्यांनी जिल्हाधिकारी व पोलिस अधिक्षकांना दिलं आहे. सकाळी साडे सात वाजता ते कोल्हापूर रेल्वे स्थानकात पोहचतील. त्यानंतर नऊ वाजता अंबाबाई मंदिरात दर्शन घेऊन आपला दौरा सुरू करतील. या दौऱ्यात संताजी घोरपडे साखर कारखान्याला भेट देणार आहेत. त्यानंतर मुरगुड पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार देतील. पोलिस अधिक्षकांची भेट घेतल्यानंतर ते पत्रकारांशी संवाद साधणार आहेत. तसेच दिवसभरात भाजप कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनाही ते भेटणार आहेत.

दरम्यान, सोमय्या हे 20 तारखेला कोल्हापूरात येणार असल्याचे समजल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. आता पुन्हा एकदा सोमय्या यांचा कोल्हापूर दौरा ठरल्यानं राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 20 तारखेला सोमय्या यांचे ठिकठिकाणी झालेला जोरदार स्वागत पाहता 28 तारखेलाही कोल्हापूरात भाजपचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर एकत्र येऊ शकतात.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com