अनिल परबांनी सोमय्यांना दिलेला इशारा खरा करून दाखवला!

अनिल परब यांना नुकतीच सक्तवसुली संचालनालयाची (ईडी) नोटीस आली होती.
Anil Parab, Kirit Somaiya
Anil Parab, Kirit SomaiyaSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : महाविकास आघाडीतील मंत्र्यांवर सातत्यानं निशाणा साधणारे भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. सोमय्या यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. त्यावरून परब यांनी त्यांना कायदेशीर नोटीस पाठवत माफी मागण्यास सांगितले होते. पण सोमय्या यांनी माफी न मागितल्यानं अखेर परब यांनी मोठं पाऊल उचललं आहे.

अनिल परब यांना नुकतीच सक्तवसुली संचालनालयाची (ईडी) नोटीस आली होती. पण नियोजित कार्यक्रमांचे कारण देत परब चौकशीला सामोरे गेले नाहीत. मनी लाँर्डिंग प्रकरणात ईडीकडून परब यांचीही चौकशी केली जाणार आहे. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपयांच्या वसुलीचे आरोप केले आहेत. या प्रकरणात परब यांचाही हात असल्याचा गंभीर आरोप सोमय्या यांनी केला आहे.

Anil Parab, Kirit Somaiya
नव्या मुख्यमंत्र्यांसह सिध्दू दिल्लीत; अमरिंदरसिंग यांना पुन्हा धक्का देण्याची तयारी

तसेच परिवहन विभागातही परब यांनी वसुली केल्याचा सोमय्या यांनी आरोप केले आहेत. परिवहन विभागातील अधिकारी बजरंग खरमाटे व वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत पैसे वसुली करून परब यांना दिले जात असल्याचा तसेच दापोली येथील परबांचे हॉटेल या प्रकरणांवर सोमय्या यांनी गंभीर आरोप केले आहेत.

त्यानंतर परब यांनी सोमय्या यांना माफी मागण्यास सांगितले होते. परब यांनी अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशारा सोमय्या यांना दिला होता. पण सोमय्या यांनी माफी मागितली नाही. त्यानंतर मंगळवारी परब यांनी सोमय्या यांच्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात 100 कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. याबाबत त्यांनी ट्विटरवरून माहिती दिली आहे.

'किरीट सोमय्या यांनी माझी बदनामी व मानहानी केल्याबद्दल मी त्यांना कायदेशीर नोटीस देऊन ७२ तासांत माफी मागण्याचे सूचित केले होते. परंतु त्यांनी माफी मागितली नसल्याने मी आज किरीट सोमय्या यांच्या विरोधात मा. उच्च न्यायालयात १०० कोटी रुपयांचा अब्रूनुकसानीचा दावा दाखल केला आहे,' असं परब यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com