प्रदेशाध्यक्षांना वैतागून माजी मुख्यमंत्री देणार धक्का

काँग्रेसची डोकेदुखी कमी होण्याऐवजी आता वाढतच चालली आहे. आणखी एका राज्यात पंजाबची पुनरावृत्ती होण्याची चिन्हे आहेत.
Mukul Sangma
Mukul Sangma

नवी दिल्ली : काँग्रेसची (Congress) डोकेदुखी कमी होण्याऐवजी आता वाढतच चालली आहे. पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे. तर गोव्याच्या माजी मुख्यमंत्र्यांनी नुकताच तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. आता आणखी एक माजी मुख्यमंत्री काँग्रेसला रामराम करण्याच्या वाटेवर आहेत. विशेष म्हणजे पंजाबप्रमाणेच मेघालयमध्ये (Meghalaya) प्रदेशाध्यक्षांना वैतागून माजी मुख्यमंत्री मुकुल संगमा (Mukul Sangma) पक्षातून बाहेर पडण्याची शक्यता आहे. ते हाय कमांडच्या भेटीसाठी दिल्लीत दाखल झाले आहेत.

पंजाबमधील राजकीय संकट अद्याप संपलेले नाही. अमरिंदरसिंग हे पक्ष सोडण्याच्या निर्णयावर ठाम असून, ते पुढील आठवड्यात नवी पक्षाची घोषणा करण्याची शक्यता आहे. त्यातच आता काँग्रेसला मेघालयमधून धक्का बसण्याची शक्यता आहे. मेघालयचे माजी मुख्यमंत्री मुकुल संगमा बाहेर पडण्याच्या वाटेवर आहेत. ते सध्या मेघालय विधानसभेचे विरोधी पक्षनेते आहेत. संगमा हे खासदार विन्सेन्ट पाला यांना प्रदेशाध्यक्षपदी नियुक्त केल्यापासून नाराज आहेत.

संगमा हे उद्या दिल्लीत दाखल होत आहेत. ते काँग्रेस हाय कमांडची भेट घेऊन त्यांच्या अडचणी मांडणार आहेत. हाय कमांडने राज्यात हस्तक्षेप करुन अंतर्गत वाद सोडवावेत, यासाठी ते आग्रही आहेत. संगमा यांनी पक्ष सोडण्याच्या चर्चेवर थेटपणे उत्तर देणे टाळले आहे. परंतु, याचा पूर्णपणे इन्कार केलेला नाही. हाय कमांडने मेघालयात लक्ष न घातल्यास आणखी एका राज्यात प्रदेशाध्यक्षांमुळे माजी मुख्यमंत्री पक्ष सोडण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते.

Mukul Sangma
उत्तर प्रदेशातही बंगालची पुनरावृत्ती? भाजप लागली कामाला

संगमा यांना फोडण्याची जबाबदारी तृणमूल काँग्रेसने राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या संस्थेला दिल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे गोव्यातील माजी मुख्यमंत्र्यांना फोडल्यानंतर आता मेघालयातील माजी मुख्यमंत्र्यांसाठी तृणमूलने फासे टाकले आहेत. अद्याप संगमा यांनी तृणमूलच्या ऑफरचा स्वीकार केलेला नाही. गोव्याचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे नेते लुईजिन्हो फलेरो यांनी नुकताच कोलकता येथे तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांच्यासोबत गोव्यातील काँग्रेसच्या काही वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसह नऊ जण तृणमूलमध्ये दाखल झाले आहेत. फलेरो यांनी काँग्रेस सोडण्यात राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांचा मोठा हात असल्याचा खुलासा फलेरो यांनीच केला आहे.

Mukul Sangma
महागाईने होरपळलेल्या जनतेला मोदी सरकारचा आणखी एक धक्का

मागील काही दिवसांपासून प्रशांत किशोर हे काँग्रेसच्या जवळ गेल्याचे मानले जाते. त्यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासह राहुल व प्रियांका गांधी यांचीही भेट घेतली होती. त्यामुळे ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या राजकीय चर्चाही रंगल्या होत्या. त्यातच फलेरो यांनी तृणमूलमध्ये जाण्यापूर्वी किशोर यांची भेट झाल्याचा गौप्यस्फोट गुरूवारी केला होता. आता संगमा यांच्याशीही किशोर यांच्या टीमचीच चर्चा सुरू असल्याचे समोर आलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com