काँग्रेस नेतृत्वाने राजीनामा मागे घेण्याचा आदेश दिला अन् सिद्धू म्हणाले...

पंजाबमध्ये राजीनामा सत्र सुरू असल्याने काँग्रेस नेतृत्वाने सिद्धूंना राजीनामा मागे घेण्याचा आदेश दिला आहे.
Rahul Gandhi, Priyanka Gandhi and  Navjot Singh Sidhu
Rahul Gandhi, Priyanka Gandhi and Navjot Singh SidhuFile Photo
Published on
Updated on

नवी दिल्ली : पंजाब (Punjab) काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu) यांनी पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्यानंतर पक्षात एकच खळबळ उडाली आहे. सिध्दूंपाठोपाठ एका कॅबिनेट मंत्र्यांसह चार पदाधिकाऱ्यांनीही त्यांच्या समर्थनार्थ राजीनामे दिले आहेत. हे राजीनामा सत्र सुरू असल्याने काँग्रेस नेतृत्वाने सिद्धूंना राजीनामा मागे घेण्याचा आदेश दिला आहे. यावर सिद्धू यांनी आज अखेर उत्तर दिले आहे.

काँग्रेस हाय कमांडकडून सिध्दू यांच्या राजीनामा स्वीकारण्यात आलेला नाही. उलट हाय कमांडकडून सिध्दूंना आधी राज्याच्या पातळीवरच वादविवाद मिटवण्याचा सल्ला दिल्याचे काँग्रेसमधील सूत्रांनी सांगितलं. त्यामुळे सध्यातरी सिध्दू यांचं पद शाबूत राहणार आहे. मात्र, याबाबत सिध्दू यांची भूमिका स्पष्ट झालेली नव्हती. अखेर सिद्धू यांनी मौन सोडून सविस्तर उत्तर दिले आहे.

सिद्धू यांनी एक व्हिडीओ ट्विट केला आहे. यात त्यांनी म्हटले आहे की, माझी लढाई ही मुद्द्यावर आहे आणि त्यावर खूप काळापासून ठाम आहे. पंजाबच्या विकासाच्या अजेंड्यावर कोणतीही तडजोड केली जाणार नाही. मी कधीही हाय कमांडची दिशाभूल केलेली नाही अथवा दिशाभूल होऊ दिलेली नाही. माझ्या तत्वांसाठी मी कोणताही त्याग करण्यास तयार आहे. यासाठी मी मागेपुढे पाहणार नाही. कलंकित मंत्री आणि अधिकाऱ्यांची निवड करण्यात आली त्यावेळी ही व्यवस्था ही मोडून काढली. अशा प्रकारच्या निवडीला माझा विरोधच राहील.

सिध्दू यांच्या राजीनाम्यानंतर प्रदेश सरचिटणीस योगिंदर धिंग्रा यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. त्याआधी कॅबिनेट मंत्री रजिया सुलताना, खजिनदार गुलजार इंदर चहल व प्रशिक्षण विभागाचे सरचिटणीस गौतम सेठ यांनीही पदाचा राजीनामा दिला आहे. सिध्दू यांच्या समर्थनार्थ या नेत्यांनी राजीनामे दिल्यानं काँग्रेसची डोकेदुखी वाढत चालली आहे. सिध्दू यांना पाठिंबा देण्यासाठी आणखी काही नेते राजीनामे देऊ शकतात, अशी चर्चा आहे.

Rahul Gandhi, Priyanka Gandhi and  Navjot Singh Sidhu
मोठी बातमी : शपथ घेतल्यानंतर 48 तासांतच कॅबिनेट मंत्र्यांचा राजीनामा

सिद्धू यांनी पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना दोन ओळीचा राजीनामा पाठवला आहे. तडजोड केल्यानंतर माणसाच्या व्यक्तिमत्वाचा ऱ्हास सुरू होते. मी पंजाबचे भविष्य आणि कल्याण यासोबत तडजोड करणार नाही. यामुळे पंजाब काँग्रेस प्रदेश समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे. मी काँग्रेस सेवा करीत राहीन, असे सिद्धू यांनी राजीनामापत्रात म्हटले आहे. यामुळे ते काँग्रेस सोडणार नसल्याचे संकेत मिळत आहेत.

Rahul Gandhi, Priyanka Gandhi and  Navjot Singh Sidhu
काँग्रेसच्या कॅप्टनला भाजप करणार केंद्रात कृषीमंत्री?

तत्कालीन मुख्यमंत्री अमरिंदरसिंग आणि नवज्योतसिंग सिद्धू यांच्यात मागील 2017 च्या विधानसभा निवडणुकीपासून वाद सुरू आहे. भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेल्या सिद्धू यांनी काँग्रेसच्या विजयानंतर पंजाबमध्ये उपमुख्यमंत्रिपद मिळेल, अशी शक्यता होती. परंतु, अमरिंदरसिंग यांनी याला विरोध केल्याने सिद्धू यांना दुसरे मंत्रालय देण्यात आले होते. तेव्हापासून दोघांचा वाद सुरू असून, आता सिद्धू यांनी उघड बंड पुकारले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com