Man Ki Baat : 'मन की बात'चा १०० वा भाग; पंतप्रधान मोदी यांनी साधला 'या' खास लोकांशी संवाद

India News : पर्यावरणासह समाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तिंमुळे देशाला प्रेरणा मिळाली
Narendra Modi
Narendra ModiSarkarnama

PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मन की बात' कार्यक्रमाने रविवारी (ता. ३० एप्रिल ) 100 वा भाग पूर्ण केला आहे. दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी प्रसारित होणारा हा कार्यक्रमासाठी आज देशभर प्रदर्शनासाठी मोठी तयारी करण्यात आली होती. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी समाजासर पर्यावरणासाठी काम करणाऱ्या काही खास व्यक्तिंशी संवाद साधला. संबंधितांनीही त्यांच्या कामाची माहिती देत पुढील वाटचाल कशी असेल याबाबत देशाला माहिती दिली. यात प्रदीप सांगवान, सुनील जगलान आणि मंजूर अहमद यांचा समावेश होता. तसेच त्यांच्या कार्याने संपूर्ण देशवाशियांना प्रेरणा मिळाली असेल, अशी आशाही पंतप्रधान मोदी यांनी यावेळी व्यक्त केली.

Narendra Modi
Bodwad Bazar Samiti Result : शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटलांना धक्का; खडसे गटाची मोठी आघाडी

प्रदीप सांगवान हे हीलिंग हिमालय फाऊंडेशनचे संस्थापक आहेत. त्यांनी हिमालयातील कचरा साफ करण्याचे कठीण काम हाती घेतले आहे. हिमालयातील निसर्गसौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी सांगवान आणि त्यांची टीम हिमालयात खडतर प्रवास करतात. हिमालयातील कचरा जमा करून आणतात. याबाबत पंतप्रधान मोदी (Narendra Modi) यांनी सांगवान यांना काही प्रश्न विचारून माहिती घेतली. पंतप्रधान म्हणाले, “आज आपल्यासोबत हिमालयाचे आरोग्य जपणारे प्रदीप आहेत. आजकाल तुमची मोहीम कशी चालली आहे? त्यावर सांगवान यांनी त्यांच्या कामाची माहिती दिली.

प्रदीप सांगवान म्हणाले, “आम्ही 2020 नंतर पहिल्या पाच वर्षांत जेवढे काम करायचो ते आता केवळ एका वर्षात केले आहे. आम्ही आधी संघर्ष करत होतो. लोक साथ देत नव्हते. मात्र मन की बातमध्ये या कामाचा उल्लेख झाल्यावर चित्र बदलेले आहे. सध्या आम्ही दररोज पाच टन कचरा गोळा करतो. दरम्यान, खचलो होतो, मात्र तुमच्या मदतीने जोमाने कास करत आहोत."

Narendra Modi
Ner APMC Election Result : पालकमंत्री संजय राठोड यांनी दिग्रस गमावले, पण नेरमध्ये मिळवला विजय !

यावेळी जम्मू काश्मिरमध्ये पर्यावरणावर काम करणारे मंजूर अहमद यांच्या पंतप्रधान मोदी यांनी संवाद साधला. त्यावेळी मोदी म्हणाले, मी नेहमी म्हणतो की परदेश दौऱ्यावर जाण्यापूर्वी आपण आपल्या देशातील पर्यटन स्थळांना भेट दिली पाहिजे. आज जग ज्या पर्यावरणासाठी चिंतेत आहे त्याबाबतही मन की बातचे प्रयत्न सुरू आहेत. आपल्या देशात पर्यावरण वाचवून रोजगार निर्मिती करणारे लोक आहेत. त्यातीलच एक जम्मू आणि काश्मीरचे मंजूर अहमद. ते पेन्सिल स्लेटची निर्मिती करून पर्यावरण वाचवून अनेकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. आता तुमचे काम कसे सुरू आहे.? त्यावर मंजूर अहमद यांनी पंतप्रधानांचे आभार मानून त्यांच्या कामाबाबत माहिती दिली.

मंजूर अहमद म्हणाले, “आमचे काम खूप चांगले चालले आहे. जेव्हापासून तुम्ही मन की बातमध्ये आमच्याबद्दल बोललात, तेव्हापासून खूप काम वाढले आहे. इतरांना रोजगार मिळत आहे. माझ्याकडे दोनशेहून अधिक लोक आहेत. एक-दोन महिन्यात आणखी दोनशे लोकांना रोजगार वाढेल. आपल्या कामामुळे शेतकऱ्यांनाही फायदा झाला. तसेच येथील दोन हजार झाडांची संख्या आता पाच हजारांवर गेली आहे. दरम्यान पेन्सिल स्टेलला मागणी वाढली आहे. मला समाजात नवी ओळख मिळाली आहे."

Narendra Modi
Dharangaon Bazar Samiti Election : गुलाबराव पाटलांची होमपीचमध्ये जोरदार बॅटींग ; धरणगावात आठ जागांवर..

यावेळी पंतप्रधान मोदी यांनी सेल्फी विथ डॉटर या मोहिमेची आठवण करून दिली. त्यावेळी त्यांनी हरियाणाचे सुनील जगलान यांच्याशी संवाद साधला. पंतप्रधान म्हणाले, “माझ्या मनावर जगलान यांच्या कामाचा प्रभाव पडला आहे. त्यांनी हरियाणातील जेंडर फायबरवर माझ्याशी बरीच चर्चा झाली. बेटी बचाओ, बेटी बचाओ या अभियानाची सुरुवातही मी हरियाणातूनच केली होती. जेव्हा मला सुनीलजींचा सेल्फी विथ डॉटर मोहिमेचा अनुभव आला. आता पुन्हा यावर चर्चा होत असताना तुम्हाला कसे वाटते? तुमची मुलगी कशी आहे, ती काय करते?" यावर जगलान म्हणाले, “माझी एक मुलगी सातवी आणि दुसरी चौथीत शिकत आहे. तुमचा मोठा चाहता. तुमच्या कामांमुळे देशातील अनेक मुलींच्या चेहऱ्यावर हस्य फुलत आहे."

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com