Rajya Sabha Election: सत्ताधारी विरोधकांच्या गदारोळातही राज्यसभेचे उमेदवार बिनविरोध; एस. जयशंकर यांच्यासह 'या' नेत्यांची निवड

S. Jaishankar News : राज्यसभेच्या सर्व अकरा जागांवर बिनविरोध उमेदवार निवडून आल्या आहेत.
S. Jaishankar, Derek O'Brien, Dola Sen News
S. Jaishankar, Derek O'Brien, Dola Sen NewsSarkarnama
Published on
Updated on

West Bengal Rajya Sabha Election: राज्यसभेच्या सर्व अकरा जागांवर बिनविरोध उमेदवार निवडून आल्या आहेत. पश्चिम बंगालमधील सहा, गुजरातमधील तीन आणि गोव्यातील एका जागेवर बिनविरोध निवडणूक झाली. पश्चिम बंगालमधील राज्यसभेच्या एका जागेसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीतही मतदान होणार नाही. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, टीएमसी नेते डेरेक ओब्रायन यांच्यासह सर्व उमेदवार विजयी झाले आहेत.

राज्यसभेसाठी 24 जुलैला मतदान होणार होते. 11 जागांपैकी तृणमूलचे (Trinamool Congress) सहा आणि भाजपाचे पाच उमेदवार विजयी झाले आहेत. यासह राज्यसभेत भाजपाची एक जागा वाढली आहे. आता राज्यसभेत भाजपाचे 93 खासदार झाले आहेत. पश्चिम बंगालमधील कूचबिहार येथील अनंत महाराज भाजपाचे (BJP) उमेदवार म्हणून बिनविरोध विजयी झाले आहेत.

S. Jaishankar, Derek O'Brien, Dola Sen News
Ajit Pawar News : राजेश टोपे अजितदादांसोबत ? राष्ट्रवादीतील आमदारांच्या भूमिकांचा गोंधळ

टीएमसीचे डेरेक ओब्रायन, सुखेंदू शेखर रॉय आणि डोला सेन यांना पुन्हा एकदा राज्यसभेची खासदारकी मिळाली आहे. याशिवाय साकेत गोखेल, समीरुल इस्लाम, प्रकाश चिक बडाइक हे तृणमूल काँग्रेसकडून राज्यसभेवर गेले आहेत. आता काँग्रेसची (Congress) राज्यसभेतील एक जागा कमी झाली आहे. त्याचवेळी भाजपाच्या एका जागेत वाढ झाली आहे.

राज्यसभेमध्ये भाजपा आणि मित्रपक्षांचे मिळून 105 खासदार झाले आहेत. भाजपाला पाच नामनिर्देशित आणि दोन अपक्ष खासदारांचा पाठिंबा मिळणार हेही निश्चित आहे. अशा प्रकारे सरकारच्या बाजूने 112 खासदार आहेत, तरीही भाजपाला बहुमतासाठी 11 सदस्य कमी आहेत. सरकारला बहुजन समाज पक्ष, जेडीएस आणि टीडीपीच्या प्रत्येकी एका खासदाराच्या पाठिंब्याची अपेक्षा आहे.

S. Jaishankar, Derek O'Brien, Dola Sen News
Pune Political News: राजा बराटे-सुशील मेंगडेंचं बिनसलं ! कर्वेनगरात रंगणार दोस्तीत कुस्ती ?

त्याचवेळी केंद्र सरकारने दिल्ली सरकारच्या विरोधात आणलेल्या अध्यादेशाला 105 पक्ष विरोध करत आहेत. अशा परिस्थितीत सरकारला बीजेडी आणि वायएसआरसीपीची मदत लागेल. या दोन्ही पक्षांचे 9-9 खासदार आहेत. विधेयक चर्चेसाठी आणि मतदानासाठी आल्यावर सभागृहातच याबाबत निर्णय घेणार असल्याचे बीजेडीने म्हटले आहे. तर वायएसआरसीपीने अद्याप त्यांचे पत्ते उघडलेले नाही.

Edited by : Amol Jaybhaye

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com