AAP News : दिल्ली विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाच्या झटक्यातून आम आदमी पक्ष (आप) अजुनही सावरला नाही. विधानसभेतला पराभवानंतर आणखी एक मोठा धक्का पक्षाला बसला आहे. एक दोन नव्हे तर तब्बल 15 नगरसेवकांनी पक्षाचा राजीनाम देत स्वतंत्र आघाडी उभारली आहे.
नगरसेवक हेमचंद्र गोयल यांच्या नेतृत्वाखाली सुमारे 15 नगरसेवकांची शनिवारी बैठक झाली, ज्यात काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या सर्व नगरसेवकांनी 'आप' पक्षाचा राजीनामा देत तिसरी आघाडी तयार करण्याचा निर्णय घेतला. या नव्या गटाचे नेतृत्व माजी सभागृह नेते मुकेश गोयल यांच्याकडेच असणार आहे. या 15 नगरसेवकांनी आपल्या आघाडीला 'इंद्रप्रस्थ विकास पार्टी' असे नाव दिले आहे.
सध्या भाजपकडे 117 नगरसेवक आहेत, तर 'आप'कडे 113 नगरसेवक होते. काँग्रेसकडे 8 नगरसेवकांची ताकद आहे. राजीनामा दिलेल्या 15 नगरसेवकांमध्ये दिनेश भारद्वाज, सुमन अनिल राणा, मुकेश गोयल, हेमचंद्र गोयल यांचा समावेश आहे.
माजी सभागृह नेते मुकेश गोयल म्हणाले, आम्ही ग्राऊंडवरून काय सांगतो हे कधीच पक्षात ऐकले जात नाही. वरून आदेश येतो आणि त्याची अंमलबजावणी करण्यास सांगितले जाते. मला सभागृह नेते बनवले गेले मला मला कोणतीही माहिती दिली गेली नाही. हेमचंद्र गोयल म्हणाले, पक्षात विकेंद्रकरण झाले पाहिजे असे म्हटले जात मात्र सत्ता फक्त एकाच माणसाच्या हातात एकवटली आहे.
आपमधून बाहेर पडून तिसरी आघाडी स्थापन करणाऱ्या तिसऱ्या आघाडीमध्ये मुकेश गोयल, हेमचंद्र गोयल, दिनेश भारद्वाज,हिमानी जैन, उषा शर्मा, साहिब कुमार, राखी कुमार,अशोक पांडे,राजेश कुमार,अनिल राणा,देवेंद्र कुमार, रोनाझी शर्मा यांचा समावेश आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.