बंगळूर : राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या भारत जोडो यात्रेनंतर कर्नाटकात (Karnatka) वारे बदलले आहे. भाजपची (BJP) सत्ता असलेल्या या राज्यात काँग्रेसला (Congress) अच्छे दिन येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे, त्यामुळेच इतर पक्षातील अनेक नेते काँग्रेस प्रवेशासाठी इच्छुक आहेत. काँग्रेसचे कर्नाटक अध्यक्ष डी. के. शिवकुमार (D. K. Shivkumar) यांनी त्याबाबतची माहिती दिली आहे. माजी पंतप्रधान एच. डी. देवैगौडा यांच्या पक्षाकडून विधानसभा निवडणूक लढलेले पंधरा नेते काँग्रेसमध्ये येणार आहेत. तसेच, अनेक आश्चर्यकारक घडामोडी पुढील काही दिवसांत घडणार आहेत, असेही शिवकुमार यांनी स्पष्ट केले. दरम्यान, भाजपचे विधान परिषद सदस्य ए. एच. विश्वनाथ यांनीही काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचे संकेत दिले आहेत. (15 leaders of DHJD along with BJP will join Congress soon)
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार हे सदाशिवनगर येथे पत्रकारांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी काँग्रेसमध्ये होणाऱ्या प्रवेशाबाबत सूतोवाच केले. भाजप आमदार विश्वानाथ हे आपल्या समर्थकांसह प्रवेश करणार आहेत. यावर सुरू असलेल्या चर्चेवर शिवकुमार म्हणाले की, काँग्रेस पक्षाच्या विचारधारेवर विश्वास असणाऱ्यांनी आमच्या पक्षात यावे. आम्ही त्यांचे स्वागत करू. कारण राजकारण हे साचलेले पाणी नसते, ते कायम प्रवाही असते. एखादा नेता खुर्ची सोडून गेला की त्या खुर्चीवर कोणीतरी येऊन बसणारच आहे.
शिवकुमार म्हणाले की, यू. बी. बनकर, व्ही. एस. पाटील, मधु बंगारप्पा, सरथ बाचेगौडा हे सर्व पक्षांतरीत आहेत का? हिरेकेरूरमध्ये यू. बी. बनकर यांचा अल्प फरकाने पराभव झाला. आता ते काँग्रेस पक्षात आले आहेत. शिवराम हेब्बार यांच्याविरोधात निवडणूक लढविणारे व्ही. एस. पाटील यांनीही काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. याशिवाय धर्मनिरपेक्ष जनता दलाकडून विधानसभा निवडणूक लढवलेले आणि पराभूत झालेल्या १५ नेतेही काँग्रेस प्रवेशासाठी इच्छूक आहेत. आगामी काळात अनेक धक्कादायक घडामोडी घडणार आहेत, असेही विधान त्यांनी केले.
गुब्बी श्रीनिवास यांना उमेदवारी दिल्यास बंडखोरी करून निवडणूक लढवणार असल्याच्या वक्तव्याबाबत ते म्हणाले, ‘पक्षाला फायदा होईल, अशा पद्धतीने तेथे उमेदवारी देऊ. बंड करायचे असेल, त्यांना खुशाल बंड करू द्या. प्रत्येक व्यक्तीच्या गुणवत्तेवर आम्ही निर्णय घेणार आहेात, असे शिवकुमार यांनी स्पष्ट केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महिन्यातून दोनदा कर्नाटकातील निवडणुकांसाठी राज्यांत येणार आहेत. 'फक्त दोन दिवसांसाठीच का? त्यांनी तर कायम इथेच राहावे आणि प्रचार करावा. मोदी हे स्टार प्रचारक असून पदामुळे त्यांना आदर देऊया, असेही काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवकुमार यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.