Himachal Pradesh : सुखविंदर सिंग सुखू होणार नवे मुख्यमंत्री; थोड्याच वेळात होणार घोषणा

सुखविंदर सिंग सुखू हे नादौन विधानसभा मतदारसंघातून चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहेत.
Sukhwinder Singh Sukhu
Sukhwinder Singh SukhuSarkarnama
Published on
Updated on

शिमला : तब्बल दोन दिवसांचा काथ्याकूट आणि आमदारांशी ‘वन टू वन’ चर्चा केल्यानंतर हिमाचल प्रदेशच्या (Himachal Pradesh) मुख्यमंत्रीपदासाठी (Chief Minister) सुखविंदर सिंग सुखू (Sukhwinder Singh Sukhu) यांचे नाव निश्चित झाले आहे. काँग्रेस (Congress) पक्षश्रेष्ठींनी सुखविंदर सिंग सुखू यांच्या नावाला मंजुरी दिली आहे. शिमला येथील विधानसभा संकुलात काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक सुरू आहे. या बैठकीनंतर सुखू यांच्या नावाची घोषणा केली जाणार आहे. (Sukhwinder Singh Sukhu will be the new Chief Minister of Himachal Pradesh)

सुखविंदर सिंग सुखू यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी जाहीर करण्यामागे काँग्रेसच्या श्रेष्ठींच्या मनात पंजाब कनेक्शन असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, सुखविंदर सिंग सुखू हे हिमाचल प्रदेश काँग्रेस निवडणूक प्रचार समितीचे विद्यमान अध्यक्ष आहेत. ते नादौन विधानसभा मतदारसंघातून चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहेत.

Sukhwinder Singh Sukhu
Himachal Pradesh : मुख्यमंत्रिपदासाठी या तीन नेत्यांची नावे आघाडीवर : शिमल्यात काँग्रेस आमदारांची बैठक सुरू

पक्ष निरीक्षक आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदर सिंग हुड्डा आणि हिमाचल प्रदेश काँग्रेसचे प्रभारी राजीव शुक्ला यांनी राजधानी शिमल्याच्या चौरा मैदानावर असलेल्या सिसिल हॉटेलमध्ये प्रत्येक आमदाराची स्वतंत्रपणे भेट घेतली. त्यानंतर सध्या विधानसभेच्या आवारात काँग्रेस आमदारांची बैठक बोलावण्यात आली आहे. ती सध्या सुरू आहे.

Sukhwinder Singh Sukhu
Himachal Pradesh : मुख्यमंत्रिपदासाठी काँग्रेसमध्ये मोठे घमासान : सिंह समर्थकांची घोषणाबाजी; सुखविंदर सिंग समर्थक आमदारांची बैठक

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पक्ष निरीक्षकांना विधिमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा करण्यास सांगितले आहे. त्यानुसार सुखविंदर सिंग सुखू यांच्या नावाची घोषणा होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com