शिवसेनेचे 15 खासदार दिल्ली पोलीस आयुक्तांच्या कार्यालयात धडकले आणि...

संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले मी दिल्लीतच बसलो आहे आणि दिल्लीतही शिवसेना आहे.
Shiv Sena MP

Shiv Sena MP

sarkarnama

Published on
Updated on

नवी दिल्ली : शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याविरूध्द दिल्ली पोलिसांनी दाखल केलेला एफआयआर पूर्वग्रहदूषीत असून तो रद्द करावा, अशी जोरदार मागणी शिवसेनेच्या (Shiv Sena) खासदारांनी आज दिल्ली पोलिस आयुक्त राकेश अस्थाना यांच्याकडे केली. मूर्ख किंवा महामूर्ख ही शिवी होऊ शकत नाही, असेही या खासदारांनी आयुक्तांना सांगितले. अस्थाना यांनी, साऱ्यांच्या बाजू काटेकोरपणे पाहूनच पुढील कारवाई होईल. अन्याय होणार नाही, असे आश्वासन दिले असे खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी सांगितले.

<div class="paragraphs"><p>Shiv Sena MP</p></div>
शेतकऱ्यांचा आवाज खासदार कोल्हेंनी थेट संसदेत पोचवला!

खासदार राऊत यांच्या विरोधात दिल्ली भाजपच्या महिला नेत्यांनी केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही तक्रार मुळातच खोटी व चुकीची असल्याने ती रद्द करावी, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. शिवसेनेच्या 15 खासदारांच्या शिष्टमंडळाने याबाबत पोलिस आयुक्त अस्थाना यांची भेट घेऊन चर्चा केली. दिल्ली पोलिस मुख्यालयात अर्धा तास ही भेट झाली. खासदार अनिल देसाई, विनायक राऊत, गजानन कीर्तीकर, अरविंद सावंत आदी शिवसेना खासदार या वेळी उपस्थित होते.

विनायक राऊत म्हणाले, संजय राऊत यांच्याविरोधातील तक्रार पूर्वग्रहदूषीत असल्याचे शिवसेना खासदारांनी अस्थाना यांच्या लक्षात आणून दिले. त्यातील कलमेही चुकीची आहेत. राऊत यांनी पक्ष वा संघटना अशा कोणाचेही नाव घेतले नाही. मूर्ख, महामूर्ख ही शिवी होऊ शकत नाही, असेही आम्ही सांगितले. अस्थाना यांनी, याची तटस्थ चौकशी करू व कोणावहरही अन्याय होऊ देणार नाही असे आश्वासन दिल्याचेही राऊत म्हणाले.

<div class="paragraphs"><p>Shiv Sena MP</p></div>
शेतकऱ्यांना चिरडण्याचं पाप गंगेतील स्नानानं धुवून निघणार नाही!

मी दिल्लीतच आहे : संजय राऊत

मी दिल्लीतच बसलो आहे आणि दिल्लीतही शिवसेना आहे. कोणाला यायचे असेल तर जरूर माझ्याकडे या, अशा शब्दांत संजय राऊत यांनी आपल्याविरूध्दच्या तक्रारीबाबत पोलिसांना प्रतिआव्हान दिले. माझ्याविरूधद चुकीच्या पध्दतीने गुन्हा दाखल केला असल्याचे राऊत यांनी सांगितले. राऊत म्हणाले की संसद अधिवेशन चालू आहे व मीही दिल्लीतच बसलो आहे. अधिवेशन संपल्यानंतरही येथेच असेन. येताय तर या, तुमची वाट पाहतो.

मी काही चुकीचे बोललेलो नाही व माझ्याकडून कोणताही गुन्हा घडलेला नाही. शब्द व शब्दांचे अर्थ मला नीट समजतात. तक्रारदार यांपेक्षा त्यांचे अर्थ मला समजतात. माझे सारे आयुष्यच शब्दांच्या संगतीत गेले आहे. तक्रार समजून न घेताच पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हा बोगस गुन्हा आहे व कायद्याचा व सत्तेचा गैरवापर करण्यात आला आहे, असेही राऊत म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com