Lok Sabha Session Live : नवे खासदार, नवी बाकं! लोकसभेत कोण कुठं बसणार, कसं ठरतं?

Parliament Session 2024 Live Newly Elected MPs 18th Lok Sabha Session : लोकसभा निवडणुकीत मतदारांनी एनडीएच्या बाजून कौल दिला. त्यानंतर सोमवारपासून 18 व्या लोकसभेच्या कामकाजाला सुरूवात झाली.
Parliament
ParliamentSarkarnama

New Delhi : लोकसभा निवडणुकीत विजय मिळाल्यानंतर देशभरातील खासदार संसदेत दाखल झाले आहेत. 18 व्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनात या खासदारांना सदस्यत्वाची शपथ दिली जात आहे. त्यानंतर ते सभागृहाचे अधिकृत सदस्य होतील. पण अधिवेशनाच्या काळात ते कुठे बसणार, शेजारी कोण असणार, हे सगळं कसं ठरतं, कोण ठरवतं? जाणून घेऊयात याविषयी...

लोकसभेच्या सभागृहात कोणत्या पक्षाचे खासदार कुठे बसणार, यासाठी काही नियम आहेत. सभागृहात बसण्याची जागा त्यांच्या पक्षाच्या खासदारांच्या संख्येवर ठरत असते. ज्या पक्षाचे जास्त खासदार, त्यानुसार आसनव्यवस्था असते. सभागृहात बसण्यासाठी अनेक ब्लॉक असतात. पक्षाच्या खासदारांच्या संख्येनुसार हे ब्लॉक निश्चित केले जातात.

Parliament
Lok Sabha Session Live : इकडे मोदींनी सांगितले ‘18’ चे शुभ संकेत अन् तिकडे विरोधकांचा अपशकून!

एखाद्या पक्षाचे पाचहून अधिक खासदार असतील त्यांची स्वतंत्र व्यवस्था असते. पाचहून कमी संख्या असलेल्या पक्षाच्या खासदारांना एकाच ब्लॉकमध्ये जागा मिळत नाही. त्यानंतर अपक्ष खासदारांना जागा दिली जाते.

सभागृहात पहिली विभागणी सत्ताधारी पक्ष आणि विरोधक या आधारावर होते. लोकसभा अध्यक्षांच्या उजव्या बाजूला सत्ताधारी आणि डाव्या बाजूला विरोधक असतात. विरोधी पक्षनेते किंवा सभागृहातील पक्षनेते यांना पहिल्या आसनांवर स्थान मिळते. त्यानंतर खासदारांच्या संख्येनुसार आसनव्यवस्था असते.

Parliament
Lok Sabha Session Live : इकडे मोदींनी सांगितले ‘18’ चे शुभ संकेत अन् तिकडे विरोधकांचा अपशकून!

ज्येष्ठ खासदारांचं काय?

सभागृहामध्ये अनेक ज्येष्ठ खासदार असतात. त्यांच्या पक्षाच्या खासदारांची संख्या पाचपेक्षाही कमी असते. पण त्यानंतरही या खासदारांची ज्येष्ठता आणि तब्बेत विचारात घेऊन त्यांना सुरूवातीच्या आसनांवर जागा दिली जाते. माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा, मुलायम सिंह यादव यांनाही हा मान देण्यात आला होता.

कोण ठरवतं जागा?

लोकसभा अध्यक्षांकडून आसनव्यवस्था निश्चित केली जाते. खासदारांची जागा अध्यक्ष नियमानुसार ठरवतात. त्यानुसारच खासदारांना आपल्या आसनांवर बसावे लागते. आसन सोडून इतर ठिकाणी बसता येत नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com