नवी दिल्ली : पेट्रोल-डिझेलच्या नियमीत वाढणाऱ्या किंमतीने सर्वसामान्य नागरिक होरपळत असतानाच आज मे महिन्याचा पहिल्या दिवशी एलपीजी सिलेंडरच्या किंमतींनी दणका दिला आहे. व्यावसायिक वापराच्या १९ किलो एलपीजी गॅस सिलेंडरच्या ((LPG Cylinder price hiked)) दरात आज तब्बल १०२.५० रुपयांची वाढ झाली असून हा सिलेंडर आता २ हजार ३५५.५० रुपयांना मिळणार आहे. त्यामुळे हॉटेलमधील जेवण आणखी महागण्याची शक्यता असून, सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे.
१९ किलोच्या एलपीजी सिलेंडरच्या गॅस सिलेंडरशिवाय ५ किलो एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात देखील वाढ झाली असून ६५५ रुपयांना मिळणार आहे. यापूर्वी १ एप्रिल रोजी देखील १९ किलो एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात तब्बल २५० रुपयांची वाढ झाली होती. त्याआधीही १ मार्च रोजी व्यावसायिक गॅसच्या दरात १०५ रुपयांची वाढ झाली होती. त्यामुळे एकूण मागील ३ महिन्यांमध्ये तब्बल ४५७ रुपयांची वाढ झाली आहे.
दरम्यान विनाअनुदानित घरगुती गॅससाठी ९४० ते ९७० रुपये मोजावे लागत आहेत. यापूर्वी मार्च महिन्यात घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात ५० रुपयांनी वाढ झाली होती. या सर्व वाढीच्या दरम्यान इंडियन ऑईल कॉर्पोरेशन, हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन आणि भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन देशभरात रविवारी उज्जवला दिवस साजरा करण्यासाठी ५ हजार एलपीजी पंचायतचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमात सुरक्षित आणि सातत्याने वापरासाठी माहिती दिली जाणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.