PM मोदी उद्यापासून युरोप दौऱ्यावर : ६५ तासांत तब्बल २५ बैठकांचे व्यस्त वेळापत्रक

PM Narendra Modi |Europe Visit | : पंतप्रधान मोदी यांचा २०२२ मधील पहिलाच परदेश दौरा
PM Narendra Modi
PM Narendra ModiSarkarnama
Published on
Updated on

दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) २ मे पासून तीन दिवसीय युरोप (Europe) दौऱ्यावर रवाना होणार आहेत. या दौऱ्यात ते जर्मनी, डेन्मार्क आणि फ्रान्सला भेट देणार आहेत. प्रत्यक्षात हा तीन दिवसांचा दौरा असला तरी एकूण ६५ तास ते या देशांमध्ये असणार आहेत. या काळात ते तब्बल २५ बैठका आणि कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत. यावर्षातील त्यांचा हा पहिलाच विदेश दौैरा आहे. गतवर्षी नोव्हेंबर महिन्यात ग्लासगो येथील हवामान परिषदेला पंतप्रधान मोदी यांनी हजेरी लावली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी २ आणि ३ मे रोजी जर्मनीला भेट देणार आहेत. त्यानंतर ३ आणि ४ मे रोजी ते डेन्मार्कला जाणार असून परतीच्या प्रवासादरम्यान फ्रान्सला भेट देणार आहेत. यावेळी काही वेळ ते पॅरिसमध्ये थांबणार आहेत. या सर्व दौऱ्यात पंतप्रधान मोदी ७ देशांमधील ८ नेत्यांसोबत द्विपक्षीय आणि बहुपक्षीय बैठक करणार आहेत. याशिवाय ५० जागतिक व्यावसायिकांशीही संवाद साधणार आहेत.

PM Narendra Modi
गुजरात भाजपचे बडे नेते PM मोदींच्या भेटीला; विधानसभा मुदतपूर्व बरखास्त करणार?

रशिया-युक्रेन युद्धामुळे पंतप्रधानांचा दौरा महत्त्वाचा

सध्या सुरु असलेल्या रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांचा हा युरोप दौरा महत्वाचा मानला जात आहे. रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ला करुन सुरु केलेल्या युद्धाविरोधात जवळपास संपूर्ण युरोप एकवटला आहे. त्यातच रशिया भारताचा मित्र राष्ट्र आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी या युद्धाविषयी युरोपमध्ये जावून काय बोलणार याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com