सर्वसामान्यांचा स्वयंपाक महागणार! LPG गॅसच्या दरात २५० रुपयांची घसघशीत वाढ

LPG Cylinder price hiked | India | Petrol - Deiseal : पेट्रोल डिझेलचे भाव आज स्थिर मात्र गॅस सिलेंडरने दिला दणका
LPG Cylinder News
LPG Cylinder NewsSarkarnama
Published on
Updated on

दिल्ली : मागच्या दहा दिवसांपासून सातत्याने वाढणाऱ्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरांनी वाढण्यास आज विश्रांती घेतली आहे. मात्र आज सर्वसामान्य ग्राहकांना एलपीजी गॅस सिलेंडरने दणका दिला आहे. स्वयंपाकासाठी लागणाऱ्या एलपीजी गॅस सिलेंडरच्या (LPG Cylinder price hiked) दरात आज एकाच फटक्यात तब्बल २५० रुपयांची घसघशीत वाढ झाली आहे. १९ किलो व्यावसायिक वापराच्या एलपीजी सिलेंडरच्या किंमतींमध्ये २५० रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे या सिलेंडरची किंमत आता आजपासून २ हजार २५३ रुपये झाली आहे.

दरम्यान घरगुती वापराच्या एलपीजी गॅसच्या किंमतींमध्ये कोणतीही वाढ झालेली नाही. यापूर्वी मार्च महिन्यात घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात ५० रुपयांनी वाढ झाली होती. याशिवाय पेट्रोल आणि डिझेलच्या दर आज स्थिर असले तरीही मागील १० दिवसांपासून पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ सुरू आहे. दिल्लीत पेट्रोलचा दर प्रतिलिटर १०१.८१ रुपये झाला असून, डिझेलचा दर ९३.०७ रुपये आहे. तर मुंबईत पेट्रोलचा दर ११६.७२ रुपये आणि डिझेलचा दर १००.९४ रुपये आहे. आगामी काळात टप्प्याटप्प्याने पेट्रोल, डिझेलच्या दरात प्रतिलिटर सुमारे १२ ते २५ रुपयांपर्यंत वाढ होईल, असा इशारा विश्लेषकांनी दिला आहे.

रशियाने युक्रेनवर पुकारलेल्या युद्धाचे चटके आता सगळ्यांनाच बसू लागले आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर खनिज तेलाच्या भावाचा भडका उडाला आहे. खनिज तेलाचा भाव आता प्रतिबॅरल ११० डॉलरवर गेला आहे. यामुळे पेट्रोलियम कंपन्यांना दरवाढ करण्याशिवाय पर्याय नाही. असे असतानाही उत्तर प्रदेशसह पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीच्या काळात पेट्रोल, डिझेलचे दर सुमारे चार महिने स्थिर होते. या निवडणुकांच्या निकालानंतर पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी सिलिंडरच्या दरात आता वाढ सुरू झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com