Narendra Singh Kushwaha: भाजपच्या नेत्यासाठी तीन अंक ठरला लकी ; तिसऱ्यांदा झाले आमदार..

Madhya Pradesh Assembly Results 2023 : तीन, तेरा, तेवीस हा अंक नरेंद्र सिंह कुशवाह यांच्यासाठी लकी ठरल्याचे बोलले जाते.
Narendra Singh Kushwaha
Narendra Singh KushwahaSarkarnama
Published on
Updated on

Delhi Political News : निवडणुकीतील विजयासाठी अनेक उमेदवार ज्योतिष अंक शास्त्राचा आधार घेतात. त्याचा प्रत्यय यंदाच्या मध्य प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीतही आला. भाजप उमेदवाराने तीन हा अंक आपल्यासाठी लकी असल्याचे सिद्ध करीत तिसऱ्यांदा आमदार होण्याचा मान मिळवला.

काही जण त्यांच्या आयुष्यात अंकशास्त्राच्या आधारे निर्णय घेत असतात. घर,गाडी खरेदी करण्यासाठी त्यांच्या आयुष्यात अंकांना खूप महत्व असते. मध्य प्रदेशात चंबळ भागातील भाजपच्या नेत्याने आपल्यासाठी तीन हा क्रमांक शुभ असल्याचे सांगितले होते. भाजपचे हे नेते दुसरे कोणी नसून भिंड विधानसभा मतदार संघातून विजयी झालेले नवनिर्वाचित आमदार नरेंद्र सिंह कुशवाह आहेत.

विधानसभा निवडणूक नक्की जिंकणार अन् आणि आमदार होणार, अशी घोषणा त्यांनी केली होती.या मागे कारण होते तीन हा आकडा. कारण त्यांच्यासाठी 3 चा अंक शुभ असल्याचा दावा त्यांनी केला होता. हा दावा खरा ठरला.

नरेंद्र सिंह कुशवाह हे विजयी झाले. भिंड विधानसभेच्या खांदा रोडवर झालेल्या निवडणूक प्रचार सभेला संबोधित करण्यासाठी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत त्यांनी आपणच निवडणूक जिंकणार, असे ठामपणे सांगितले होते.

Narendra Singh Kushwaha
Dhananjay Munde News : मुख्यमंत्र्यांच्या कौतुकाचे धनी ठरले मुंडे! 'माझीच नजर ना लागो माझ्या या वैभवाला'

ते 2003 आणि 2013 मध्येही विजयी झाले होते. 2008 च्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. पण 2013 मध्ये भाजपने त्यांना पुन्हा उमेदवारी दिली होती. यात ते विजयी झाले होते. आता 2023 मध्ये त्यांना पुन्हा एकदा भाजपने उमेदवारी दिली. यावेळी 3 चा आकडा असल्याने त्यांनी विजयश्री खेचून आणली आहे, असे त्यांच्या समर्थकांचे मत आहे.

2003, 2013, 2023 यात तीन अंक असल्याचे आपला विजय झाल्याची भावना नरेंद्र सिंह कुशवाह यांची आहे. तीन डिसेंबरला लागलेल्या निकालाच्या दिवशीही हा दावा खरा ठरला. त्यांनी काँग्रेसचे उमेदवार राकेशसिंह चतुवैदी यांचा १४ हजार मतांनी पराभव केला. तीन, तेरा, तेवीस हा अंक कुशवाह यांच्यासाठी लकी ठरल्याचे बोलले जाते.

Narendra Singh Kushwaha
Bharat Gogawale : मी मंत्री का होत नाही ? भरतशेठ आता देवालाच विचारणार..

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com