BJP Politics News: राज्यात सध्या भाजप नेत्यांनी औरंगजेब आणि त्यांची कबर यावरून वातावरण तापवलं आहे. रोज यावर वेगवेगळी विधाने आणि वादग्रस्त वक्तव्य होताना दिसतात. हा प्रत्येक नेत्यासाठी राजकीय चर्चेचा विषय बनला आहे.
भारतीय जनता पक्षाचे गुजरातचे प्रदेशाध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री सी आर पाटील रविवारी जळगाव दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी औरंगजेब हा विषय काढताच काढता पाय घेतला. या विषयावर बोलणे त्यांनी टाळले. त्यामुळे हा चर्चेचा विषय बनला आहे.
विधिमंडळातील चर्चेसह राज्यातील विविध नेते औरंगजेब हा विषय चर्चेत घेत आहेत विशेषतः छावा चित्रपटाच्या निमित्ताने त्याची चर्चा होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील याबाबत विधिमंडळात उल्लेख केला होता. भाजपचे अनेक नेते याबाबत सातत्याने विधाने करीत आहेत.
औरंगजेब विषयाच्या निमित्ताने धार्मिक ध्रुवीकरण तसेच सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील वाद तापत ठेवण्याचा प्रयत्न आहे भाजपच्या विविध नेत्यांनी त्याबाबत जाणीवपूर्वक विधाने केली आहेत. खासदार उदयनराजे भोसले यांनी देखील असेच वादग्रस्त विधान केले आहे त्यामुळे राज्याच्या राजकारणात हा सध्या वादाचा आणि राजकारणाचा विषय बनला आहे.
(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)
विधिमंडळातील चर्चेसह राज्यातील विविध नेते औरंगजेब हा विषय चर्चेत घेत आहेत विशेषतः छावा चित्रपटाच्या निमित्ताने त्याची चर्चा होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील याबाबत विधिमंडळात उल्लेख केला होता. भाजपचे अनेक नेते याबाबत सातत्याने विधाने करीत आहेत.
औरंगजेब विषयाच्या निमित्ताने धार्मिक ध्रुवीकरण तसेच सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील वाद तापत ठेवण्याचा प्रयत्न आहे भाजपच्या विविध नेत्यांनी त्याबाबत जाणीवपूर्वक विधाने केली आहेत खासदार उदयनराजे भोसले यांनी देखील असेच वादग्रस्त विधान केले आहे त्यामुळे राज्याच्या राजकारणात हा सध्या वादाचा आणि राजकारणाचा विषय बनला आहे.
मात्र हा विषय केवळ महाराष्ट्र पुरताच मर्यादित ठेवण्याचा भाजपचा प्रयत्न तर नाही ना, अशी शंका येते. त्याला कारणही तसेच ठरले आहे या प्रकारचे राजकारण गुजरातमध्ये जोरात असते. मात्र गुजरात भाजपचे प्रदेश अध्यक्ष आणि केंद्रातील मंत्री सी आर पाटील यांनी मात्र हा आमचा विषयच नाही, असे सांगत हा प्रश्न झटकला.
छावा चित्रपटाच्या निमित्ताने तसेच भाजपशी संबंधित विलास कोरटकर आणि अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी वादग्रस्त विधाने केली होती. त्यावरून जोरदार आंदोलन देखील राज्यभर झाले. याबाबत पोलिसांत तक्रार देखील करण्यात आली आहे. मात्र यातील कोणालाही अटक झालेली नाही. सध्या राज्य सरकारने त्यांना बंदोबस्त पुरवला आहे.
याच पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने भाजप आणि राज्य सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले होते त्या अनुषंगाने औरंगजेबचा विषय देखील पुढे आला होता मात्र सी आर पाटील यांनी तो आमचा विषय नाही, असे सांगून त्याला एक नवे राजकीय वळण दिले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.