Mumbai Mantralaya News : मुंबईतील मंत्रालय नियंत्रण कक्षाला धमकीच्या फोन आल्याची माहिती समोर येत आहे. पुढील एक ते दोन दिवसात अतिरेकी हल्ल्ला करण्याची धमकी देण्यात आलेली आहे. मंत्रालय नियंत्रण कक्षाच्या लँडलाईनवर हा धमकीचा फोन आला होता. या धमकीनंतर आता मुंबई पोलीस सतर्क झाले आहेत.
एक ते दोन दिवसात अतिरेकी हल्ला करू, अशी धमकी या फोनवरून देण्यात आलेली आहे. अतिरेकी कारवाईची धमकी फोनवरून देण्यात आली आहे. यामुळे आता मुंबई पोलीस सतर्क झाले असून, अॅलर्ट मोडवर गेले आहेत. या अनुषंगाने आता फोनचा शोध घेण्यात येत आहे. याबाबत तपास सुरू करण्यात आला आहे.
मागील काही काळापासून राजकीय नेत्यांना धमकी येण्याची मालिकाच सुरू असताना, आता थेट अतिरेकी कारवाई करण्याचा इशारा देण्यात आल्याने, यामुळे खळबळ उडाली आहे. याचा शोध आता घेण्यात येत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.