Rahul Gandhi यांना बाँम्बनं उडवून देण्याची धमकी देणाऱ्या साठ वर्षीय व्यक्तीला मध्यप्रदेशातून अटक..

Rahul Gandhi threatened News : दया सिंह उर्फे प्यारे सिंह असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
Rahul Gandhi  threatened News
Rahul Gandhi threatened News Sarkarnama

Rahul Gandhi threatened News : काँग्रेसचे माजी अध्यक्ष, माजी खासदार राहुल गांधी यांना धमकी देणाऱ्या साठ वर्षीय व्यक्तीला मध्यप्रदेशातून अटक करण्यात आली आहे.

राहुल गांधी यांना भारत जोडो यात्रेत जीवे मारण्याची धमकी त्याने दिली होती. दया सिंह उर्फे प्यारे सिंह असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. गुन्हे शाखेनं ही कारवाई केली आहे.

दया सिंह उर्फे प्यारे सिंह हा बैतुल येथील राजेंद्रनगर येथील रहिवाशी आहे. त्याला उज्जैन येथून अटक करण्यात आली. एनएसए (NSA)अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. दया सिंह याच्याविरोधात अटक वारंट जारी करण्यात आले होते.

Rahul Gandhi  threatened News
Jairam Ramesh News : सभापतींना चिअरलीडर म्हणणं काँग्रेस नेत्याला पडलं महागात.. ; हक्कभंगाची नोटीस..

पोलीस उपायुक्त निमिष अग्रवाल म्हणाले, "गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात एका व्यक्तीनं मिठाईच्या दुकानात पत्र लिहून राहुल गांधींना धमकी दिली होती, इंदुरमध्ये बाँम्बस्फोट करुन त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती,"

Rahul Gandhi  threatened News
Barsu Refinery News : आंदोलन चिघळलं : विनायक राऊत ताब्यात ; पोलिसांनी अश्रुधुरांच्या नळकांड्या..

पोलिसांनी तेव्हा दया सिंह याला पकडले होते. मात्र तो जामीनावर बाहेर होता. त्यानंतर तो फरार झाला. त्याच्याविरोधात जिल्हाधिकाऱ्यांनी अटक वारंट जारी केले होते. बुधवारी त्याला पकडण्यात पोलिसांना यश आले.

मिठाईच्या दुकानात मिळालेल्या पत्रात शिखांच्या दंगलीचा उल्लेख करण्यात आला होता. धमकी देणाऱ्या व्यक्तीने काँग्रेस नेता कमलनाथ यांना मारण्याची धमकी दिली होती. "शिखांच्या दंगलीच्या विरोधात कुठल्याही पक्षाने आवाज उठवला नाही," असे त्या पत्रात म्हटलं होतं

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com