Lok Sabha Election: आंध्र प्रदेशात मोठी कारवाई; तब्बल 7 कोटी रुपयांची रोकड जप्त, अपघातामुळे झाला नोटा तस्करीचा पर्दाफाश

Lok Sabha Election 2024: सध्याच्या लोकसभा निवडणुकीच्या काळात पैसा आणि अवैध दारु आणि नशेच्या पदार्थांचा सुळसुळाट पाहायला मिळत आहे. दरम्यान, याआधी ईडी (ED), सीबीआयच्या धाडीत विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात रोकड जप्त करण्यात आली आहे.
Lok Sabha Election 2024
Lok Sabha Election 2024Sarkarnama
Published on
Updated on

Andhra Pradesh Lok Sabha Election 2024: सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. निवडणुकीच्या काळात उमेदवारांकडून अनेकदा मतदारांना पैसे वाटले जातात. यासाठी निवडणूक आयोगाकडून उमेदवारांनी जास्त प्रमाणात पैशाचा वापर करु नये यासाठी काही नियमावली ठरवून दिली आहे. तरीदेखील सध्याच्या लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) काळात पैसा आणि अवैध दारु आणि नशेच्या पदार्थांचा सुळसुळाट पाहायला मिळत आहे. दरम्यान, याआधी ईडी (ED), सीबीआयच्या धाडीत विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात रोकड जप्त करण्यात आली आहे.

अशातच आता आंध्र प्रदेशातून (Andhra Pradesh) तब्बल 7 कोटी रुपयांची रोकड पोलिसांनी जप्त केली आहे. तर आंध्र प्रदेशातील ही दुसरी मोठ्या प्रमाणात रोकड जप्त केल्याची घटना आहे. शुक्रवारी एनटीआर जिल्ह्यात तब्बल 8 कोटी रुपये पोलिसांकडून जप्त करण्यात आले होते. अशातच आता पूर्व गोदावरी जिल्ह्यामध्ये टाटा एस या छोटा हत्ती वाहनातून पुठ्ठ्याच्या बॉक्समध्ये लपवून 7 कोटी रुपयांची रोकड नेली जात होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मात्र, नल्लाजर्ला मंडलातील अनंतपल्ली येथे या छोटा हत्तीची ट्रॅक्टर ट्रॉलीला धडक झाली. या धडकेमुळे छोटा हत्तीमधून नेण्यात येत असलेले बॉक्स रस्त्यावर पडले, आश्चर्याची बाब म्हणजे बॉक्स खाली पडताच त्यातील नोटांचे बंडलच रस्त्यावर पडले. छोटा हत्तीमध्ये काही पुठ्ठयांचे बॉक्स होते, ज्यामध्ये रोकड ठेवण्यात आली होती. ती ट्रॅक्टरच्या धडकेत रस्त्यावर पडल्याचं पाहताच स्थानिकांनी तत्काळ पोलिसांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले.

विजयवाडा येथून हे वाहन विशाखापट्टणमकडेच्या दिशेने जात असताना ही अपघाताची घटना घडली. या अपघातात छोटा हत्ती वाहनातील चालक जखमी झाला असून त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. आंध्र प्रदेशमध्ये लोकसभेच्या चौथ्या टप्प्यासाठीचं मतदान होत आहे. राज्यातील 25 लोकसभा मतदारसंघात 13 मे रोजी हे मतदान पार पडणार आहे. त्यामुळे, निवडणूक अधिकारी व प्रशासकीय यंत्रणा अलर्ट मोडवर काम करत आहेत.

Lok Sabha Election 2024
Ajit Pawar Vs Amol Kolhe : बिबट्यांची नसबंदी अन् कोल्हेंची शिकार; शिरूरमध्ये 'असा' आहे अजितदादांचे 'प्लॅन'

'या' मतदारसंघासाठी मतदान होणार

विशाखापट्टनम, अनकापल्ली, काकिनाड़ा, अमलापुरम, राजमुंदरी, अराकू, श्रीकाकुलम, विजयनगरम, नरसापुरम, एलुरु, मछलीपट्टनम, विजयवाड़ा, गुंटूर, नरसारावपेट, बापटला, ओंगोल, नांदयाल, कर्नूलु, अनंतपुर, हिंदूपुर, कडपा, नेल्लोर, तिरुपति (आरक्षित), राजमपेट आणि चित्तूर या मतदारसंघात मतदान होणार आहे.

(Edited By Jagdish Patil)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com