Ajit Pawar Vs Amol Kolhe : बिबट्यांची नसबंदी अन् कोल्हेंची शिकार; शिरूरमध्ये 'असा' आहे अजितदादांचे 'प्लॅन'

Shirur Lok Sabha Constituency : शिरूरमधील जुन्नर, आंबेगाव, शिरूर व खेड तालुक्यातील बिबट्यांच्या हल्ल्याच्या प्रश्नही त्यांनी उचलून धरला आहे. येथील अनेक भाषणात पवार, शिरूरमध्ये सर्वात मोठा प्रश्न सध्या बिबट्यांचा आहे. त्यांचा बंदोबस्त करावाच लागणार आहे.
Amol Kolhe, Ajit Pawar
Amol Kolhe, Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Shirur Political News : 'मै जो बोलता हूँ वो करके दिखाता हूँ...' असा काहीसा 'रावडी स्टालई'मध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांनी खासदार अमोल कोल्हेंनी पराभूत करण्याचा चंग बांधला आहे. बारामतीचे मतदान झाल्यानंतर ते आता शिरूर लोकसभा मतदारसंघात ठाण मांडून आहेत.

अमोल कोल्हेंना चारीमुंड्या चित करण्यासाठी अजित पवारांनी प्रचारात एक वेगळाच मुद्दा आणला आहे, तो म्हणजे बिबट्यांच्या नसबंदीचा. शिरूरमधील बिबट्यांच्या वाढत्या संख्येला आळा घालून शेतकऱ्यांना दिलासा देऊन अजितदादा अमोल कोल्हेंची शिकार करण्याचा तयारीत असल्याची चर्चा सुरू आहे. Ajit Pawar warns Amol Kolhe.

शिरूरमध्ये 13 मे रोजी मतदान होत असून त्यानिमित्त प्रचारात रंगत आली आहे. अजित पवारांनी मध्ये अमोल कोल्हेंना उमेदवारी देऊन निवडून आणण्यासाठी संपूर्ण ताकद लावली. आता मात्र अमोल कोल्हेंना पराभूत करण्यासाठी तीच ताकद लावल्याचे दिसून येत आहे. आपले उमेदवार शिवाजीराव आढळरावांना Shivajirao Adhalrao Patil निवडून आणण्यासाठी दादांनी दोन्ही बाह्या मागे सारल्या आहेत. आता त्यांनी शिरूर मतदारसंघात तब्बल 460 बिबटे असून त्यांच्या नसबंदीची घोषणा केली आहे. बिबट्याची नसबंदी करताना अजित पवारांचा अमोल कोल्हेंचीही शिकार करायचा राजकीय इरादा स्पष्ट झाल्याची चर्चा रंगू लागली आहे.

सध्याच्या प्रचारात अजित पवारांनी Ajit Pawar शिरूरच्या बहुतेक सर्वच प्रश्नांना हात घालण्याचा प्रयत्न करत आहेत. शिरूरमधील जुन्नर, आंबेगाव, शिरूर व खेड तालुक्यातील बिबट्यांच्या हल्ल्याच्या प्रश्नही त्यांनी उचलून धरला आहे. येथील अनेक भाषणात पवार, शिरूरमध्ये सर्वात मोठा प्रश्न सध्या बिबट्यांचा आहे. त्यांचा बंदोबस्त करावाच लागणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या बंधन असल्याने त्यांना मारता येत नाही. मात्र वाढत्या ऊसाच्या क्षेत्राने बिबट्यांची पैदासही वाढली आहे. पूर्वी वर्षातून एकदाच प्रजनन होणारी मादी दोनदा बछड्यांना जन्म देते. यासाठी सरकारी स्तरावर एकीकडे पिंजऱ्यांची संख्या वाढवली जाते. तर दुसरीकडे बिबट्यांच्या नसबंदीचा कार्यक्रमही हाती घेत असल्याचे पवारांनी स्पष्ट केले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Amol Kolhe, Ajit Pawar
Sureshdada Jain News : जळगावात मोठा ट्विस्ट; राजकारणातून संन्यास घेणाऱ्या सुरेशदादा जैन यांचा भाजपला पाठिंबा

शिरूर, आंबेगाव, खेड व जुन्नर तालुक्यातील हा प्रश्न पुढे मांडून अजित पवार एकीकडे बिबट्यांच्या नसबंदीबाबत बोलत असले, तरी त्यांना या प्रचाराने डॉ. कोल्हेंची Amol Kolhe शिकार करायची असल्याचे लपून राहिले नाही. अजितदादांच्या आरोपांना खासदार कोल्हेही आता सडेतोड उत्तर देत आहेत. त्यामुळे शिरूरमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आता अजित पवार हे अमोल कोल्हेंची शिकार करणार का, कोल्हे पुन्हा खासदार होणार याकडे लक्ष आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Amol Kolhe, Ajit Pawar
Loksabha Election 2024 : बारामतीची निवडणूक पवार v/s सुळे; तटकरेंनी मांडलं विजयाचं गणित...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com