धक्कादायक : एकाच शाळेतील 85 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण

देशभरातील कोरोना रुग्णांचा आकडा वेगाने वाढू लागला आहे.
85 students test positive for Covid-19

85 students test positive for Covid-19

Sarkarnama

नवी दिल्ली : मागील काही दिवसांपासून देशातील कोरोना (Corona) रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यातच ओमिक्रॉन (Omicron) या नव्या कोरोना प्रकराचा धोकाही वाढला आहे. सध्या देशातील अनेक राज्यांमध्ये शाळा व महाविद्यालये सुरू असून विद्यार्थ्यांमध्येही कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे चित्र आहे. उत्तराखंड (Uttarakhand) मधील एकाच शाळेतील 85 विद्यार्थ्यांना (Students) कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे.

नैनीताल (Nainital) जिल्ह्यातील जवाहर नवोदय विद्यालयातील हे विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या वसतिगृहात विलग करण्यात आले आहे. सुरूवातीला या शाळेतील 11 विद्यार्थी कोरोनाबाधित झाले होते. त्यामुळे एकूण 488 विद्यार्थ्याचे नमूने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यांचा अहवाल आल्यानंतर एकूण 85 विद्यार्थी बाधित असल्याचे स्पष्ट झाले.

<div class="paragraphs"><p>85 students test positive for Covid-19</p></div>
पराभवानंतर अजितदादांचं राणेंना आवाहन; म्हणाले, मिळून कोकणचा कायापालट करू!

शाळेत 30 डिसेंबर रोजी करण्यात आलेले चाचणीत मुख्याध्यापकांसह आठ विद्यार्थी व इतर कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. अद्याप काही विद्यार्थ्यांचे अहवाल आलेले नाहीत. त्यामुळे बाधितांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. कोरोनाबाधित विद्यार्थ्यांपैकी 70 टक्के विद्यार्थ्यांना ताप, खोकला, सर्दी आदी लक्षणे आहेत.

दरम्यान, महाराष्ट्रातील (Maharashtra) कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे कोरोनाची तिसरी लाट (Third Wave) सुरू झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्य विभागाचे मुख्य सचिव डॉ.प्रदीप व्यास यांनी धोक्याचा इशारा दिला आहे. जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत सक्रिय रुग्णसंख्या 2 लाखांवर जाईल, असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे.

<div class="paragraphs"><p>85 students test positive for Covid-19</p></div>
दादागिरी थांबवा नाहीतर...! शशिकांत शिंदेंना डिवचत शिवेंद्रसिंहराजेंचा निर्वाणीचा इशारा

डॉ.प्रदीप व्यास म्हणाले की, राज्यात कोरोना रुग्णसंख्या सातत्याने वाढत आहे. वाढीचे हे प्रमाण पाहता सक्रिय रुग्णसंख्या जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात दोन लाखांपर्यंत जाईल. रुग्णसंख्या वाढणार असल्याने रुग्णालयांच्या क्षमतेचे व्यवस्थापन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तिसरी लाटेचा धोका असताना नागरिकांनी ओमिक्रॉनमुळे येणारी ही लाट सौम्य असेल असे समूजन गाफील राहू नये. लसीकरण न झालेले आणि विविध व्याधी असलेल्या व्यक्तींना तिसरी लाट आधीच्या लाटांएवढीच धोकादायक असेल. यामुळे लसीकरणाचे प्रमाण वाढायला हवे, जेणेकरून जास्तीत जास्त प्राण वाचतील.

महाराष्ट्र सरकारने आता विवाह सोहळा, सामाजिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रमांसह अंत्यसंस्कारांवर काही निर्बंध घातले आहेत. विवाह सोहळा अथवा सामाजिक, राजकीय आणि धार्मिक कार्यक्रमासांसाठी किमान 50 नागरिकांनाच परवानगी असेल. अंत्यविधीसाठी केवळ 20 व्यक्तींनाच परवानगी असेल. राज्यातील पर्यटनस्थळे, किनारे, खुली मैदाने आदी गर्दीच्या ठिकाणी जमावबंदी आदेश लागू करण्याची सूचना स्थानिक प्रशासनाला करण्यात आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com