दादागिरी थांबवा नाहीतर...! शशिकांत शिंदेंना डिवचत शिवेंद्रसिंहराजेंचा निर्वाणीचा इशारा

सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीनंतर दोन्ही नेत्यांमधला संघर्ष वाढला आहे.
Shashikant Shinde, Shivendraraje Bhosale

Shashikant Shinde, Shivendraraje Bhosale

Sarkarnama

Published on
Updated on

जावळी : सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या (Satara District Bank Election) निवडणुकीत आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांचा ज्ञानदेव रांजणे यांनी पराभव केला आहे. रांजणे हे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (Shivendra Raje Bhosale) यांचे कट्टर समर्थक आहे. त्यावरून आता राजकारण (Politics) तापलं असून शिवेंद्रराजेंनी शिंदेंना थेट निर्वाणीचा इशारा दिला आहे. माझ्या संयमाचा अंत पाहू नका. तालुक्यात दादागिरीचे राजकारण थांबले नाही तर यापुढे विरोधकांना जशास तसे उत्तर देण्याचा गर्भित इशारा त्यांनी दिला आहे.

सातारा (Satara) जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवारी (ता.1) आंबेघर येथे आयोजित अभिष्टचिंतन सोहळा व शेतकरी मेळाव्यात शिवेंद्रसिंहराजेंनी विरोधकांवर टीका केली. ते म्हणाले, सामान्य कुटुंबातील ज्ञानदेव रांजणे यांनी स्वकर्तृत्वाने व हिंमतीने विजय मिळवून इतिहास घडवला आहे. जिल्हा बँकेत आम्ही सोबत काम करणार असून रांजणे यांना ताकद देणार आहे.

<div class="paragraphs"><p>Shashikant Shinde, Shivendraraje Bhosale</p></div>
रुबल अग्रवाल, अंकित गोयल यांना नव्या वर्षात पहिल्याच दिवशी मोठं 'गिफ्ट'

जावळी तालुक्यात येऊन दादागिरी, दहशत माजवण्याचे प्रकार कोणीही करत असेल तर त्याचा योग्य तो समाचार घेतला जाईल. विरोधकांनी विकासकामांचे राजकारण जरूर करावे. मात्र, माझ्या कार्यकर्त्यांवर कुणीही दबाव टाकल्यास मी स्वस्थ बसणार नाही. मी जावळी तालुक्यात आल्यामुळे काही जणांची राजकीय दुकानदारी बंद झाली आहे. त्यामुळे त्यांचे पित्त खवळत आहे. निवडणुका आल्या की स्वतः चे खिसे भरायचे व जनतेला वाऱ्यावर सोडायचे, असले उद्योग आता जावळीत चालणार नाहीत, अशी टीका शिवेंद्रसिंहराजे यांनी शिंदे यांचे नाव न घेता केली.

मी आमदार म्हणून काम करत असताना सर्वाधिक कामे जावळी तालुक्यात केली. सरकार कुणाचेही असो निधीची वाट न पाहता मी प्रसंगी स्वखर्चाने विकासकामे मार्गी लावली. जावळी तालुक्याने आमच्या घराण्यावर प्रेम केले आहे. त्यामुळे विकासकामांच्या बाबतीत मी कुठेच कमी पडणार नसून अतिवृष्टीमुळे वाहून गेलेल्या रस्त्यांची कामे निधी उपलब्ध झाल्यावर पूर्ण केली जातील. जावळी बँकेत राजकारण न आणता बँकेच्या प्रगतीसाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. आगामी काळात नगरपंचयातीसह जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक ताकदीने लढवणार असून रांजणे यांना यापुढेही अशीच ताकद देणार असल्याची ग्वाही शिवेंद्रराजेंनी दिली.

<div class="paragraphs"><p>Shashikant Shinde, Shivendraraje Bhosale</p></div>
काही दिवसांपूर्वीच लग्नबंधनात अडकलेला विकी कौशल अडचणीत

रांजणे यांनीही शिंदे यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, जिल्हा बँकेची निवडणूक हे फक्त निमित्त होते. जावळी तालुक्यात येऊन दादागिरी करायची, लोकांची माथी भडकावयची असले प्रकार वाढू लागल्याने तालुक्यातील जनतेने ही निवडणूक हातात घेऊन माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला विजयी केले आहे. आमदार शिवेंद्रसिंहराजे व वसंतराव मानकुमरे यांच्यासह सर्वसामान्य जनता माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली म्हणून मी ही लढाई जिंकू शकलो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com