

8th Pay Commission Update: केंद्रीय कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग नेमका कधी लागू होणार? पगार किती वाढणार? हीच चर्चा सध्या देशभरात सुरु आहे. अशातच केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी 8 व्या केंद्रीय वेतन आयोगासाठी एक मोठी बदलाची मागणी केली आहे.
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही महत्वाची अपडेट समोर येत आहे. नॅशनल काऊन्सिल (स्टाफ साइड)-जॉइंट कन्सल्टेटिव्ह मशिनरी (एनसी-जेसीएम) च्या नुकत्याच झालेल्या बैठकीत ही मागणी करण्यात आली.
वेतन निश्चित करण्यासाठी सध्या वापरण्यात येणारे कुटुंब युनिट 3 वरून 5 पर्यंत वाढवावे, अशी मागमी या कर्मचारी संघटनांची केली आहे. यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.
संघटनांच्या बैठकीत हा विषय आल्यानंतर याबाबतची चर्चा जोरात सुरू आहे. केंद्र सरकारने ही मागणी मान्य केल्यास फिटमेंट फॅक्टर 3 पेक्षा जास्त होऊ शकतो. कर्मचाऱ्यांच्या आर्थिक जबाबदाऱ्या लक्षात घेऊन हे बदल प्रस्तावित करण्यात आले आहेत.
केंद्र सरकारच्या कर्मचारी संघटनांनी वेतन गणना पद्धतीत बदल सुचवला असून सध्या वेतन निश्चित करण्यासाठी कुटुंब युनिट म्हणून 3 सदस्य (पती, पत्नी आणि दोन मुले) गृहीत धरले जातात. मात्र हे युनिट 5 पर्यंत वाढवावे, ज्यात आई-वडिलांचाही समावेश करावी, असे संघटनांचे म्हणणे आहे. यामुळे वेतन सुधारणा अधिक न्याय होऊन कर्मचाऱ्यांच्या खऱ्या आर्थिक जबाबदारीचा विचार होईल, असे संघटनांनी म्हटलं आहे.पेन्शनधारक संघटनांनीही कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी असलेल्या या मागणीला पाठिंबा दिला आहे.
ऑल इंडिया एनपीएस एम्प्लॉयी फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष मंजीत सिंह पटेल यांनी याबाबत सांगितले आहे की सध्याच्या काळात कुटुंबाची व्याख्या बदलली आहे. 2007 च्या मेंटेनन्स अँड वेलफेअर ऑफ पॅरेंट्स अँड सिनियर सिटीझन्स कायद्यानुसार, मुलांना आई-वडिलांची जबाबदारी घ्यावी लागते. न्यूक्लियर फॅमिली वाढल्याने आई-वडील मुलांवर अवलंबून राहतात. ही आर्थिक जबाबदारी लक्षात घेऊन कुटुंब युनिट 5 करावे.
सध्या आठव्या वेतन आयोगाचे काम सुरू आहे. फिटमेंट फॅक्टर किती असेल, किमान वेतन किती वाढेल आणि मागिल रक्कम कोणत्या तारखेपासून मिळेल, या सगळ्या गोष्टी अजून स्पष्ट झालेल्या नाहीत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.