Sharad Pawar - Rahul Gandhi : दिल्लीत मोठी राजकीय घडामोड, मोदींच्या भाषणापूर्वीच शरद पवार- राहुल गांधींमध्ये महत्वाची बैठक

Congress & NCP Political News : ....म्हणून पंतप्रधानांच्या भाषणाआधीच राहुल गांधी आणि शरद पवार एकत्र !
Sharad Pawar - Rahul Gandhi
Sharad Pawar - Rahul GandhiSarkarnama
Published on
Updated on

Delhi : काँग्रेसप्रणित विरोधी पक्षांच्या 'इंडिया'ने मोदी सरकारविरोधात संसदेत अविश्वास प्रस्ताव आणला आहे. मागच्या दोन दिवसांपासून अविश्वास प्रस्तावावर संसदेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी होताना पाहायला मिळत आहे. गुरूवारी चर्चेचा तिसरा आणि अंतिम दिवस आहे. तसेच खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी दुपारी चार वाजता संसदेत विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर देणार आहेत. मोदी काय बोलणार? याकडे सगळ्या देशाचे लक्ष लागलेले आहे.

याआधीच दिल्लीत मोठी राजकीय घडामोड सुरू आहे. काँग्रेसचे नेते, खासदार राहुल गांधी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात महत्वाची बैठक सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी काय बोलणार? याकडे सगळ्या देशाचे लक्ष लागलेले आहे. मागच्या दोन महिन्यांपासून मणिपूरमध्ये हिंसाचार सुरु आहे. मणिपूर जळत आहेत.

Sharad Pawar - Rahul Gandhi
Hema Malini On Rahul Gandhi : राहुल गांधींच्या 'फ्लाईंग किस'वर हेमा मालिनी भलतंच बोलल्या...

काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधीं(Rahul Gandhi) नी बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिल्यानंतर बुधवारी प्रथमच संसदेत हजेरी लावताना चर्चेत सहभाग घेतला. चर्चेदरम्यान राहुल यांनी भाजपला कोंडीत पकडण्यासाठी जोरदार प्रयत्न केला. आता पंतप्रधानांच्या भाषणाआधीच राहुल गांधी आणि शरद पवार हे एकत्र आले असून त्यांच्यात बंद दरवाजाआड चर्चा सुरू आहे.

लोकसभा निवडणुकीला सामोरे जाण्याआधी विरोधी पक्षांची मोट बांधण्यासाठी मोठे पाऊल उचलले आहे. यात २६ पक्षांनी एकत्र येत इंडिया आघाडी उघडली आहे. पाटणा आणि बेंगळूरू येथील बैठकीनंतर आता इंडिया आघाडीची तिसरी बैठक मुंबईत ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी होत आहे. या बैठकी संदर्भातच ही शरद पवार(Sharad Pawar) आणि गांधी यांच्यात चर्चा सुरू असल्याचे बोलले जात आहे.

Sharad Pawar - Rahul Gandhi
Sanjay Raut On Shiv Sena : बाळासाहेबांची शिवसेना उद्धव ठाकरेंनी दोन पावलं पुढे नेली; संजय राऊतांचा दावा!

इंडिया(INDIA) आघाडीची मुंबईत होणारी बैठक ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी होईल. मुंबईतल्या सांताक्रूझमधील ग्रँड हयात हॉटेलमध्ये बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. मोदी आडनाव प्रकरणी राहुल गांधींना सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिल्यानंतर आणि लोकसभा सचिवालयाने पुन्हा खासदारकी बहाल केल्यानंतर इंडिया आघाडीच्या बैठकीवेळी काँग्रेसकडून त्यांचं मुंबईत जल्लोषात स्वागत करण्यात येणार आहे.

राहुल गांधीविरोधात भाजप आक्रमक...?

मणिपूर हिंसाचारावरून विरोधकांनी आणलेल्या अविश्वास प्रस्तवावेळी चर्चा करताना राहुल गांधींनी फ्लाईंग किस केल्याचा आरोपावरुन भाजपने बुधवारी गदारोळ केला. राहुल गांधींनी फ्लाईंग किस कृतीवर केंद्रीय मंत्री स्मृती इराणींनी आक्षेप घेतला आहे.

यानंतर सत्ताधारी पक्षांच्या २२ खासदारांनी कारवाई करण्याच्या मागणीचे पत्र दिले. यावर मथुरेच्या खासदार हेमा मालिनी यांनीही स्वाक्षरी केली आहे. कारवाई करण्याची मागणी करणाऱ्या हेमा मालिनी यांनी मात्र आपण राहुल यांना तसे काही करताना पाहिले नसल्याचे सांगितले.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com