Sanjay Raut On Shiv Sena : बाळासाहेबांची शिवसेना उद्धव ठाकरेंनी दोन पावलं पुढे नेली; संजय राऊतांचा दावा!

Sanjay Raut On Uddhav Thackeray : शिवसेना तोडणं म्हणजे महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसणं आहे. "
Sanjay Raut On Shiv Sena :
Sanjay Raut On Shiv Sena :Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची 'सामना' पॉडकास्टसाठी गेल्या महिन्यात मुलाखत झाली होती. त्याचा पुढच्या भागाचा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. या मुलाखतीत खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उद्धव ठाकरेंना शिवसेनेतील फुटीवर अनेक प्रश्न विचारले आहेत. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी बाळासाहेबांची शिवसेना दोन पावले पुढे नेली, असा दावाही राऊत यांनी केला आहे. (Latest Marathi News)

Sanjay Raut On Shiv Sena :
Amit Shah Attack On Sharad Pawar : राज्यात सरकार पाडण्याची परंपरा शरद पवारांनी सुरू केली; अमित शाहांचा घणाघात

संजय राऊत या मुलाखतीच्या टीझरमध्ये म्हणतात, "मराठी माणूस ज्याला तुम्ही घाटी असं म्हणत असता, कोकणी म्हणून हिणवत होतात, त्या माणसाला प्रतिष्ठा प्राप्त व्हावी म्हणून शिवसेनेची स्थापना झाली. आता मित्रपक्षाने फसवलं, म्हणून शिवसेना संपली का? शिवसेनेवर काही फरक पडलेला नाही. शिवसेना आग आहे. शिवसेना तोडणं म्हणजे महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसणं आहे. "

Sanjay Raut On Shiv Sena :
Vikhe Patil On District Division: जिल्ह्यांचे विभाजन होणार की नाही; राधाकृष्ण विखे-पाटलांचे मोठे संकेत !

"उद्धव ठाकरे यांनी शिवसेना पक्षाचं नेतृत्व स्वीकारल्यापासून बाळासाहेबांची संघटना नक्कीच दोन पावलं पुढे नेली. भाजपने आमच्याशी ज्या प्रकारे वर्तवणूक केली. त्यांना क्षमा नाही. ते शिवसेनेला घाबरतात. ते महापालिकेच्या निवडणुका घेत नाहीत. लोकसभा घेतील का नाही ती शंका आहे. जो जनतेला घाबरतो तो नेता असू शकत नाही. शंभर भ्रष्टाचारी गोळा करायचे, आणि आपल्या पक्षात आणायचे हा कोणता जनादेश आहे? याला जनादेश नाही तर व्यापार म्हणतात," असा परखड सवाल ही संजय राऊत यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com