Congress Leader Death : सुपारी देऊन गृहमंत्र्यांच्या जवळच्या नेत्याचा खून; भावी खासदार होण्याची होती इच्छा!

Congress Leader Death : आरोपींनी तत्काळ अटक करण्याची मागणी आता होत आहे.
Karnataka Government
Karnataka Government Sarkarnama
Published on
Updated on

Congress Leader Death Karnataka : काँग्रेसच्या एका नेत्याचा हत्यांकांड आता उघडकीस आला आहे. हत्येची सुपारी देऊन खून करण्यात आल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे. कर्नाटक राज्यातील कोलारमध्ये त्यांचा खून केल्याची संशय आहे. ज्यांचा खून करण्यात आला ते काँग्रेस नेते आमागी लोकसभा निवडणुकांसाठी इच्छुक होते. कोलार जिल्ह्यात असलेल्या श्रीनिवासपूर तालुका काँग्रेस नेते नगरसेवक सेनाप्पा ऊर्फ ​​श्रीनिवास असे त्यांचे नाव होते. (Latest Marathi News)

Karnataka Government
Balasaheb Thackeray On BJP: जेव्हा बाळासाहेबांनी भाजपला म्हटलं...'रक्त पिणारी कमळाबाई'

कर्नाटक विधानसभेचे माजी विधानसभेचे अध्यक्ष रमेश कुमार यांचे ते समर्थक म्हणून मानले जाते होते. एकूण सहा व्यक्तींनी त्यांच्यावर हल्ला केला. मुळबागीलू रस्ता येथे बांधकाम सुरू असलेल्या एका उपहारगृहाजवळ हा हल्ला करण्यात आला. हल्ल्यानंतर हल्लेखोरांनी पळ काढला असून, अजूनही त्यांची ओळख पटलेली नाही. रक्ताच्या थारोळ्यात पडलेले श्रीनिवास यांना नागरिकांनी तत्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यानच त्यांचा मृत्यू झाला आहे.

NCP Nagar Politics : 'नगर दक्षिण'बाबत पवारांच्या बैठकांची बाळासाहेबांनी हवाच काढून घेतली

कर्नाटक विधानसभा मतदारसंघाचे माजी सभापती रमेश कुमार यांचे श्रीनिवास हे निकटवर्तीय होते. आणि कर्नाटक सरकारमधील गृहमंत्री परमेश्वर यांच्याही मर्जीतले मानले जात होते. स्थानिक काँग्रेसचे नेत्यांनी श्रीनिवास यांच्या निधनाबद्दल दुखं व्यक्त केले आहे. आरोपींनी तत्काळ अटक करण्याची मागणी आता होत आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com