NCP Nagar Politics : 'नगर दक्षिण'बाबत पवारांच्या बैठकांची बाळासाहेबांनी हवाच काढून घेतली

Congress-NCP Politics : राष्ट्रवादी काँग्रेसकडून नगर दक्षिण लोकसभा मतदार संघातील उमेदवाराची चाचपणी सुरू आहे.
Congress-NCP Politics :
Congress-NCP Politics : Sarkarnama
Published on
Updated on

प्रदीप पेंढारे

Nagar Political News : महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसकडून नगर दक्षिण लोकसभा मतदार संघातील उमेदवाराची चाचपणी सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी यावर मुंबईत बैठका देखील घेतल्या आहेत. शरद पवार यांच्या या बैठकीनंतर उमेदवारांची चर्चेसाठी नावे देखील पुढे येऊ लागली आहेत. मात्र, महाविकास आघाडीतील काँग्रेसचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी यावर भाष्य करत राष्ट्रवादीच्या झालेल्या बैठकांची हवा काढून घेत महाविकास आघाडी असल्याची आठवण करून दिली. 'आम्ही महाविकास आघाडीत आहोत. ही जागा कोणाच्या वाट्याला जाणार, यावर चर्चा होईल. त्यानंतर निर्णय होईल', अशी भूमिका आमदार बाळासाहेब थोरात यांनी पत्रकार परिषदेत मांडली.

नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या शरद पवार यांच्याकडून चाचपणी सुरू झाली आहे. शरद पवार यांनी मुंबई येथे गेल्या आठवड्यात आढावा बैठक देखील झाली. या बैठकीनंतर शरद पवार गटाकडून काहींची नावे चर्चेत येऊ लागली आहेत. परंतु काँग्रेस कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी देखील नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून आपले (आमदार थोरात) नाव निवडणुकीसाठी पुढे करत आहेत. यावर भूमिका मांडताना थोरात यांनी 'हा निर्णय महाविकास आघाडीचा आहे', असे सांगितले.

Congress-NCP Politics :
Maratha Reservation : आरक्षणप्रकरणी मराठा समाज आक्रमक; अजितदादांना बारामतीत घेराव, माढ्यात दाखविले काळे झेंडे

आमदार बाळासाहेब थोरात म्हणाले, "देशात इंडिया आणि राज्यात आम्ही महाविकास आघाडीत आहोत. तीन पक्षांची आघाडी आहे. त्यामध्ये चर्चा होईल. ही जागा कोणाच्या वाट्याला जाणार, यावर निर्णय होईल. यानंतर निवडणूक लढवण्याचा विषय होतो. आजच यावर बोललो, तर जागा वाटणीचा विषयच राहणार नाही. परंतु आम्ही तिघे बसून यावर निर्णय घेणार आहोत". नगर दक्षिणची जागा पूर्वी राष्ट्रवादीकडेच होती. त्यामुळे ते जागेबाबत आग्रही असतील. परंतु चर्चा करावी लागणार आहे. चर्चेत अनेक गोष्टी पुढे येतात. यानंतर जागा कोण लढवणार हे निश्चित होईल. राज्यातील 48 जागांवर लवकरच चर्चा होणार असल्याचेही आमदार थोरात यांनी सांगितले.

गर्दीची सक्ती कशाला

शिर्डी येथे पंतप्रधान यांच्या शिर्डी दौऱ्यानिमित्ताने होत असलेल्या कार्यक्रमाला जमवण्यात येणाऱ्या गर्दीच्या पद्धतीवर काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी आक्षेप घेतला. पंतप्रधान दौरा स्वागतार्ह आहे. परंतु त्यासाठी गर्दी जमवण्याची पद्धत आश्चर्यकारक आहे. शासन आपल्या दारी आताच कार्यक्रम आताच झाला आहे. शैक्षणिक संस्थांना पंतप्रधानांच्या दौऱ्यासाठी बांधून घेण्याची गरजच नाही. देशाचा पंतप्रधान येत आहे, म्हटल्यावर आपोआप गर्दी होणार आहे. मग सक्ती करण्याची गरज का भासते आहे, हा प्रश्न पडतो, असे आमदार बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.

Congress-NCP Politics :
Fadnavis on OBC, Maratha : ओबीसी, मराठ्यांचा मुद्दा बारकाईने हाताळणार; नागपुरात फडणवीसांनी दिली ग्वाही !

नगर शहरातील गुंडगिरी, दहशत थांबली पाहिजे

काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी सामाजिक कार्यकर्ते मुख्याध्यापक हेरंब कुलकर्णी यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणावरून नगह शहरातील गुंडगिरी, दहशतीवर भाष्य केले आहे. 'नगर शहरात गुंडगिरी आहे, हे स्पष्ट आहे. पोलीस प्रशासनाने यावर काम केले पाहिजे. गुंडगिरी, दहशत थांबवली पाहिजे', असे आमदार थोरात यांनी म्हटले आहे. 'नगर शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी शहरातल्या प्रमुख शाळा आणि विद्यालयांच्या ठिकाणी चाललेले अवैध धंद्यांचे स्टिंग ऑपरेशन करून प्रशासनाला जागे करण्याचे काम केले आहे. काळेंनी एक धाडसी पाऊल उचल्याचे आमदार थोरात यांनी कौतुक केले.

तांबे पिता-पुत्र लवकरच काँग्रेसमध्ये दिसणार

नाशिक पदवीधर निवडणुकीवेळी डाॅ. सुधीर तांबे आणि त्यांचे पुत्र सत्यजित यांच्या उमेदवारीबाबत पेचप्रसंग निर्माण झाला होता. डाॅ. सुधीर तांबे यांनी काँग्रेसकडून उमेदवारी नाकारत पुत्र सत्यजित यांना निवडणुकीच्या रिंगणात अपक्ष म्हणून उतरवले होते. सत्यजित निवडणुकीत विजयी झाले. यानंतर डाॅ. तांबेंवर काँग्रेसकडून निलंबनाची कारवाई झाली. सत्यजित देखील काॅंग्रेसपासून दुरावले. असे असले, तरी तांबे पिता-पुत्र आजही काँग्रेसच्या कार्यक्रमांना हजेरी असते. परंतु त्यांचा काँग्रेस प्रवेश कधी, याबाबत राजकीय चर्चा होत आहेच. काँग्रेसचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी तांबे पिता-पुत्रांच्या पक्ष प्रवेशावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, 'तांबे पिता-पुत्र हे घटनात्मक दृष्ट्या काँग्रेसशी जोडले गेलेले आहेत. त्यांची विचारधारा काँग्रेसशी आहे. पक्ष श्रेष्ठींच्या संपर्कात असून ते लवकरच काँग्रेसमध्ये दिसतील'.

Edited By- Anuradha Dhawade

Congress-NCP Politics :
Loksabha Election 2024 : मराठवाड्यासाठी महाविकास आघाडीचं ठरलं ? लोकसभेच्या जागावाटपाचं असं असणार गणित

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com