Special Sessions of Parliament
Special Sessions of ParliamentSarkarnama

Special Sessions of Parliament : मोठी बातमी! खातेवाटप पूर्ण, आता संसदेचे विशेष अधिवेशन; 'या' तारखेला होणार सुरुवात

Modi Govt 3.0 Special Sessions of Parliament : नरेंद्र मोदी यांनी रविवारी 9 जून रोजी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली आणि मोदी सरकार 3.0 ला सुरुवात झाली.
Published on

Modi Govt 3.0 Special Sessions of Parliament : नरेंद्र मोदी यांनी रविवारी 9 जून रोजी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली आणि मोदी सरकार 3.0 ला सुरुवात झाली. पंतप्रधान मोदींनी पदाचा पदभार स्विकारल्यापासून विविध निर्णय घेण्याचा सपाटा लावला आहे.

कारण शपथ घेतल्यानंतर काही तासांतच त्यांनी देशातील शेतकऱ्यांसाठी महत्वाचा निर्णय घेतला. यामध्ये त्यांनी किसान योजनेच्या 17 व्या हफ्त्याच्या फाईलवर सही केली. तर मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून 3 कोटी घरे बांधण्यासाठी निधी देण्याचा निर्णय घेण्यात आला. शिवाय मोदी सरकारमधील मंत्र्यांचं खातेवाटपही पूर्ण झालं.

अशातच आता मोदींनी (Narendra Modi) शपथ घेतली त्याच महिन्यात म्हणजे जून महिन्यातच संसदेचे विशेष अधिवेशनाला सुरू होऊ शकते अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. सुत्रांच्या माहितीनुसार संसदेचे विशेष अधिवेशन 24 जून ते 3 जुलैपर्यंत चालू शकते. 24 आणि 25 जून रोजी संसदेच्या विशेष अधिवेशनात नवीन खासदारांचा शपथविधी होईल. तर खासदारांच्या शपथविधीनंतर लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक 26 जूनला होईल.

लोकसभा अध्यक्षांची निवड आणि राष्ट्रपतींचे अभिभाषण होईल त्यानंतर राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आभार प्रस्तावाचाही अधिवेशनात समावेश असू शकतो. लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी केंद्र सरकारकडून सर्वप्रथम एका खासदाराचे नाव प्रस्तावित कण्यात येईल.

Special Sessions of Parliament
Congress : विधानसभा निवडणुकीआधीच महायुती सरकार बरखास्त करा, काँग्रेसची राज्यपालांकडे डिमांड

या प्रस्तावाला विरोधकांनी विरोध न केल्यास निवडणुका होणार नाहीत. दरम्यान, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या दोन्ही सभागृहांच्या म्हणजे लोकसभा आणि राज्यसभेच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित करू शकतात.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com